'मी यशवंतरावांचा मानसपुत्र नाही'; 'भारतरत्न'च्या मागणीवरून उदयनराजेंनी पुन्हा शरद पवारांना डिवचलं

Last Updated:

उदयनराजे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
सातारा, सचिन जाधव, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलं आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. 'मी यशवंतरावांचा मानसपुत्र नाही' असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे? 
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. यासाठी एक समिती असते. ज्या लोकांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम केलं, त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे. मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना डिवचलं आहे.
advertisement
उदयनराजे यांना यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली होती, ही निवडणूक प्रचंड अतितटीची झाली. मात्र या निवडणुकीत उदयनराजे यांनी अखेर बाजी मारली, ते विजयी झाले. त्यांनी आता पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
'मी यशवंतरावांचा मानसपुत्र नाही'; 'भारतरत्न'च्या मागणीवरून उदयनराजेंनी पुन्हा शरद पवारांना डिवचलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement