साताऱ्यात रानभाजी महोत्सव, 70 हून अधिक प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांना ग्राहकांची पसंती
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सातारा जिल्हा यांच्या वतीने राजनभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: आपण अनेकदा आंबा महोत्सव, धान्य महोत्सव, फळ महोत्सव, तांदूळ महोत्सव यांसारखे अनेक महोत्सव साजरे करत असतो. मात्र साताऱ्यात रानभाज्यांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात 70 हून अधिक रानभाज्या होत्या. त्यातील 30 हून अधिक दुर्मिळ डोंगराळ रानभाज्या विक्रीसाठी शेतकरी घेऊन आले होते. या रानभाज्यांमुळे शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्वे मिळतात. तसेच आजारही बरे होतात, असे साताऱ्यातील कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.
advertisement
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सातारा जिल्हा यांच्या वतीने राजनभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सातारा शहरातील पोलीस करमणूक केंद्र अलंकार हॉल येथे हा जिल्हास्तरीय महोत्सव झाला. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या रानभाज्यांचा महोत्सव झाला. यावेळी शेतकऱ्यांनी त्या भाज्या कशा बनवल्या जाता? हेही सांगितले.
advertisement
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी स्टॉल देण्यात आले होते. सातारा, जावली, पाटण, वाई, फलटण या डोंगराळ भागातील आणि दुष्काळी भागातील शेतकरी रानभाज्या घेऊन आले होते. या महोत्सवात एक स्टॉल असा होता की, ग्राहकांना आवडणारी रानभाजी घरपोच देण्याची सोय होती. यावेळी रानभाज्यांचं आरोग्यासाठी महत्त्व आणि औषधी गुणधर्म याबाबत माहिती कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि शेतकऱ्यांनी दिली.
advertisement
सर्वच रानभाज्यांनी वेधले लक्ष
view commentsकर्टोली, अळंबी, आघाडा, अमरकंद, आचकंद, कोवळे बांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, कुसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा, कुरडू, गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली, फांग, अरवी, तांदुळ कुंद्रा, काळा म्हैस वेल, चवळीच्या डेऱ्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वागोटी, हळंदा, आळूचे पान, समिंद शोक पानं, गावरण लसून, कांदा, असे विविध प्रकारचे 70 हून अधिक रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 15, 2024 10:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
साताऱ्यात रानभाजी महोत्सव, 70 हून अधिक प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांना ग्राहकांची पसंती

