Beed: स्कॉर्पिओ आणि कारची समोरासमोर धडक, 3 जण जागीच ठार, बीडमधील घटना
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाली
बीड: बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबेजोगाई- लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड- लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारचा समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना लातूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 15, 2025 10:50 PM IST









