ठाकरे बंधूंच्या युतीची मिठाई शर्मिला ठाकरेंनी वाटली? युतीच्या घोषणेआधीच शिवसेना-मनसेत मनोमिलन

Last Updated:

राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थासमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरे यांनी मिठाई वाटली.

शर्मिला ठाकरे
शर्मिला ठाकरे
शरद जाधव, प्रतिनिधी, मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय युती होणार की नाही? हे अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, असं असलं तरी युतीच्या घोषणेआधीच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय.. दसऱ्याच्या निमित्तानं तर राज ठाकरेंच्या घरातून शिवाजी पार्कात आलेल्या शिवसैनिकांना मिठाई वाटप झाल्याचं दिसलं.
राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांना मिठाई वाटणाऱ्या शर्मिला ठाकरे. दसऱ्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात गुरुवारी सकाळपासून शिवसैनिकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली. यातील काही शिवसैनिक शिवतार्थाबाहेरही जमत होते. त्याचवेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी बाहेर येत शिवसैनिकांची भेट घेत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेत मनोमिलन झाल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
advertisement
खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मागील काही दिवसात वाढलेली जवळीक जगजाहीर आहे. गेली 19 वर्ष एकमेकांचे राजकीय विरोधक असलेला दोन्ही ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं एकमेकांना पूरक अशी समान भूमिका घेताना दिसतायेत. विशेष म्हणजे त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.
advertisement
ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला
5 जुलै 2025
मराठी विजयी मेळावा
विजयी मेळाव्यानिमित्त
2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र
27 जुलै 2025
मातोश्री
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त
राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर जाऊन शुभेच्छा दिल्या
27 ऑगस्ट 2025
शिवतीर्थ निवासस्थान
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब 'शिवतीर्थ'वर
ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन
10 सप्टेंबर 2025
शिवतीर्थ निवासस्थान
उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला
advertisement
उद्धव-राज यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली
या भेटीगाठींमधून दोन्ही ठाकरे बंधूंमधली वाढलेली जवळीक जगजाहीर झालीय. यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा 10 सप्टेंबरच्या भेटीनंतर सुरू आहे. दोन्ही भावांमध्ये मागील अवघ्या 4 महिन्यात अनेकदा चर्चा झालीय. त्यामुळं हे दोन्ही भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं. त्याचेच संकेत शर्मिला ठाकरेंनी शिवसैनिकांनी मिठाई वाटून दिल्याचं बोललं जातंय.
advertisement
ठाकरेंची सेना आणि मनसेत राजकीय युतीच्या घोषणेआधीच शिवसैनिक आणि मनसैनिकांचे मनोमिलन झाल्याचं चित्र आहे. आधीही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलनं केली. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसले. आता शर्मिला ठाकरेंनी थेट शिवसैनिकांचं तोंड गोड केल्यानं ही ठाकरे बंधूंच्या युतीचीच मिठाई असल्याची चर्चा सुरू झालीय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरे बंधूंच्या युतीची मिठाई शर्मिला ठाकरेंनी वाटली? युतीच्या घोषणेआधीच शिवसेना-मनसेत मनोमिलन
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement