Maharashtra Elections Shivadi Assembly constituency : महायुतीच्या अनुपस्थितीचा बाळा नांदगावकरांना फायदा; शिवडीत उद्धव विरुद्ध राज सेना थेट सामना '

Last Updated:

Maharashtra Elections Shivadi Assembly constituency : मुंबई शहरात येणाऱ्या 10 विधानसभा जागांपैकी ही एकमेव जागा आहे जिथे शिंदे शिवसेना, भाजप आणि युतीचा एकही उमेदवार रिंगणात नाही.

महायुतीच्या अनुपस्थितीचा बाळा नांदगावकरांना  फायदा; शिवडीत उद्धव विरुद्ध राज सेना थेट सामना '
महायुतीच्या अनुपस्थितीचा बाळा नांदगावकरांना फायदा; शिवडीत उद्धव विरुद्ध राज सेना थेट सामना '
मुंबई :  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ दोन जागांवर महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यापैकी मुंबईतली जागा म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीने शिवडीतून पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवडीतून रिंगणात असलेले मनसेचे शिलेदार बाळा नांदगावकर यांना फायदा होऊ शकतो. शिवडीचे विद्यमान आमदार शिवसेनेचे अजय चौधरी उद्धव ठाकरे गटात आहेत आणि महाविकास आघाडीने त्यांनाच पुन्हा तिकिट दिलं आहे. त्यामुळे शिवडीत उद्धव ठाकरे सेना विरुद्ध राज ठाकरे सेना असा थेट सामना होणार आहे.

शिवडी विधानसभा मतदारसंघ इतिहास

शिवडी विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंबई शहरात येणाऱ्या 10 विधानसभा जागांपैकी ही एकमेव जागा आहे जिथे शिंदे शिवसेना, भाजप आणि युतीचा एकही उमेदवार रिंगणात नाही. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेड म्हणून काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. शिवडीची जागा तर बाळा नांदगावकरांसाठी महायुतीने सोडून दिली आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे 2009 च्या विधानसभेला मनसेकडून बाळा नांदगांवकर  रिंगणात होते आणि ते शिवडीचे आमदार झाले होते.
advertisement
2008 पूर्वी जुन्या रचनेत शिवडी  परिसरातून सचिन आहिर हे राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी भाजपचे दत्ता राणे हे माजी मंत्री शिवडी परिसरातून निवडून येत असत. पण 2009 नंतर मतदारसंघाची  पुनर्रचना झाली आणि बरेच नवे भाग शिवडीत समाविष्ट झाले. नव्या रचनेत शिवडीबरोबर  परळ, चिंचपोकळी आणि प्रभादेवीचा काही भागही  शिवडी  मतदारसंघात समाविष्ट झाला आहे.
advertisement

2019 विधानसभा निवडणूक निकाल

अजय चौधरी – शिवसेना (आता उबाठा गटात) – 77,687
संतोष नलावडे -  मनसे - 38,350
उदय फणसेकर -  काँग्रेस - 13,368
2019 मध्ये भाजप सेना युती होती आणि शिवसेना अखंड होती. त्या वेळी अजय चौधरी हे शिवसेनेचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने शिवडीतून  निवडून आले होते. ते आता उद्धव ठाकरेंचे समर्थक आहेत. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मनसेच्या संतोष नलावडे यांना मिळाली होती. तर आघाडीकडून  रिंगणात असलेले  काँग्रेसचे उदय फणसेकर तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते.
advertisement

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

शिवडी विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गत येतो. तिकिट वाटपापासूनच हा मतदारसंघ चर्चेत होता. सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत तिथे झाली आणि उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले आणि पुन्हा खासदार झाले. एकनाथ शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकिट दिलं होतं. पण अरविंद सावंतांनी त्यांच्यावर मात केली. आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघही दक्षिण मुंबईत येतो. अरविंद सावंत यांना शिवडी मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे इथले आमदार अजय चौधरी यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
advertisement

दक्षिण मुंबईतील इतर विधानसभा मतदारसंघातील चित्र

वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे – शिवसेना (उबाठा)
शिवडी विधानसभा – आमदार अजय चौधरी  - शिवसेना (उबाठा)
भायखळा विधानसभा - आमदार यामिनी जाधव  - शिवसेना
मलबार हिल विधानसभा – आमदार मंगलप्रभात लोढा - भाजप
मुंबादेवी विधानसभा - आमदार अमीन पटेल - काँग्रेस
advertisement
कुलाबा विधानसभा - आमदार राहुल नार्वेकर – भाजप
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Shivadi Assembly constituency : महायुतीच्या अनुपस्थितीचा बाळा नांदगावकरांना फायदा; शिवडीत उद्धव विरुद्ध राज सेना थेट सामना '
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement