'...आताच मरून जा', बुलढाण्यात तहसीलदाराचा माजोरडेपणा, हवालदिल शेतकऱ्याला दिला जीव देण्याचा सल्ला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana: बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तहसीलदाराने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तहसीलदाराने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. त्याने एका हवालदिल शेतकऱ्याला चक्क मरून जाण्याचा सल्ला दिला आहे. हा अजब प्रकार समार आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निखील पाटील असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे. त्यांनी एका शेतकऱ्याला 'मी पेट्रोल आणून देतो, तुम्ही आताच मरा' असा सल्ला दिला आहे. संबंधित शेतकरी शेताला रस्ता मिळत नाही, म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेले होते. शेताला रस्ता मिळाला नाही, तर सात दिवसात आत्मदहन करणार , असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर नायब तहसीलदार निखिल पाटलांनी "सात दिवसांनी का मरता? मी पेट्रोल आणून देतो आताच मरा" असा अजब सल्ला दिला आहे.
advertisement
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना तहसीलदार कार्यालय गाठून तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता? असा जाब विचारला. यावेळी निखील पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे समाधान न करता तहसील कार्यालयातून पळ काढला.
advertisement
हा सगळा प्रकार खामगावचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याच म्हटलं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत वागणं अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच या प्रकरणात चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Khamgaon,Buldana,Maharashtra
First Published :
November 13, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...आताच मरून जा', बुलढाण्यात तहसीलदाराचा माजोरडेपणा, हवालदिल शेतकऱ्याला दिला जीव देण्याचा सल्ला


