सहलीवर कपडे बदलतानाचा VIDEO काढला, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, वर्गमित्रांनीही घेतला गैरफायदा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे.
परभणी: परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. नराधमाने शाळेच्या सहलीदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीचा कपडे बदलताना व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केलं. तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नाही, तर याच मुलीचे एका अल्पवयीन मुलाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या मदतीने तिचे लैंगिक शोषण केले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून ४ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शिक्षक संतोष मलसटवाडसह एकूण चौघांना ताब्यात घेतले आहे.
सहलीदरम्यान शिक्षकाकडून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मलसटवाड हा एका विद्यालयामध्ये शिक्षक आहे. या शाळेची सहल रायगड आणि महाबळेश्वर येथे गेली होती. यावेळी शिक्षक संतोषने १६ वर्षीय विद्यार्थिनीचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ गुपचूप काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर अत्याचार केले.
advertisement
AI चा वापर करून बदनामीची धमकी
या दरम्यान, पीडित मुलगी ट्यूशनला गेली असताना एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह तिथे येऊन तिचा फोटो काढला आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून हा फोटो अश्लील स्वरूपात तयार केला. हा अश्लील फोटो सर्वत्र पाठवून बदनामी करण्याची धमकी देत, त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले.
advertisement
४ आरोपींना घेतले ताब्यात
मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर, कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत, आरोपी शिक्षक संतोष मलसटवाड, अत्याचार करणारा अल्पवयीन तरुण आणि त्याचे दोन मित्र अशा एकूण ४ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Location :
Parbhani,Maharashtra
First Published :
October 05, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सहलीवर कपडे बदलतानाचा VIDEO काढला, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, वर्गमित्रांनीही घेतला गैरफायदा