Solapur News : DJ च्या तालावर नाच नाच नाचला अन् जमिनीवर कोसळला, तरूणाच्या मृत्यूने सोलापूर हादरलं!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत डीजेच्या तालावर नाचता नाचता एका 28 वर्षीय तरूणाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे
Solapur Shocking News : प्रितम पंडित, सोलापूर: सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत डीजेच्या तालावर नाचता नाचता एका 28 वर्षीय तरूणाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अभिषेक बिराजदार असे या मृत तरूणाचे नाव आहे.या प्रकरणी शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
सोलापूर शहराची मिरवणुकीचे शहर म्हणून ओळख निर्माण होत चालली आहे. सोलापुरातील 365 पैकी सुमारे 200 दिवस मिरवणूक काढली जाते.त्यातून वाढता डीजेचा प्रभाव हा सोलापूरकरांच्या जीवावर बेतताना दिसून येतोय.अशीच एक घटना आता समोर आली आहे. सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना 28 वर्षे तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभिषेक बिराजदार असे या मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.या घटनेने बिराजदार कुटुंबियांवर दु:खाचाड डोंगर कोसळला आहे.
advertisement
सोलापुरात रविवारी मिरवणूक निघाली होती. या मिरवणूकीत अभिषेक बिराजदार नाचत निघाला होता. मात्र नाचून झाल्यानंतर तो एका दुकानापाशी बसला. त्यावेळेस अभिषेकच्या छातीत दुखू लागले होते. या दरम्यान त्याला हदय विकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
3 तारखेला मिरवणुकीत सामील होऊन नाचत असताना छातीत त्रास होत आहे म्हणून बाजूला बसला त्याला दवाखान्यात घेऊन गेले असता. डॉक्टर उपचार करत असताना बिराजदार मृत झाल्याचे घोषित केलं. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.
advertisement
ध्वनी प्रदूषणासंदर्भात अनेक संशोधन झाली आहेत. डीजे लावल्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शरीरासाठी डेसिमल हे घातक आवाज म्हणून ओळखलं जातं. 40 डेसिमल पर्यंत हृदयाला त्रास होत नाही. मात्र जास्त आवाज झाल्यामुळे हृदयविकार आणि पॅरलेस होण्याची शक्यता असते,असे हृदयरोग तज्ञ डॉ. सिद्धार्थ गांधी यांनी सांगितले.
वर्षभरात डीजे समोर गेल्यामुळे अनेक नागरिकांना बहिरेपणा आणि हृदयाचे विकार जडल्याचे दिसून येतं. त्यामुळे सोलापुरातील मिरवणुकीमध्ये डीजे चा वापर कमी प्रमाणात असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News : DJ च्या तालावर नाच नाच नाचला अन् जमिनीवर कोसळला, तरूणाच्या मृत्यूने सोलापूर हादरलं!










