बारामतीत खळबळ! इंदापूरच्या दिशेने धावत्या बसमध्ये कोयत्याने सपासप वार, पोलिसांनी सांगितलं खळबळजनक कारण

Last Updated:

Baramati Crime News : चालू बसमध्येच अविनाश सगर नावाच्या व्यक्तीने एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या अविनाश सगरला ताब्यात घेतलं आहे.

Baramati Crime News koyta attack on one ST passenger
Baramati Crime News koyta attack on one ST passenger
Baramati Crime News : बारामती तालुक्यातील काटेवाडी गावाजवळ इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका एसटी बसमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चालू बसमध्येच अविनाश सगर नावाच्या व्यक्तीने एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर हल्ला करणाऱ्या अविनाश सगरने स्वतःवरही वार करून घेतले. या अनपेक्षित घटनेमुळे बसमधील सर्व प्रवासी प्रचंड घाबरले आणि तात्काळ बस थांबवून त्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला होता.

अविनाश सगर मानसिक ताणतणावाखाली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या अविनाश सगरला ताब्यात घेतलं आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा अविनाश सगर मानसिक ताणतणावाखाली असून तो 'मेंटली डिस्टर्ब' (मानसिकदृष्ट्या अस्वस्थ) असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

खचाखच भरलेल्या बसमध्ये जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमध्ये हा हल्ला झाला, ती बस इंदापूर आगाराची होती. घटनेच्या वेळी शुक्रवारी सकाळी ही बस बारामतीवरून इंदापूरच्या दिशेनं जात होती. ही बस काटेवाडी परिसरात आली असता, एका तरुणाने बाजुला बसलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने वार केले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
advertisement
दरम्यान, ज्या तरुणावर हल्ला झाला होता, तो तरुण काटेवाडीमध्ये उतरून जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेला आहे. ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण नेमका कोण आहे? याचा तपासही पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
बारामतीत खळबळ! इंदापूरच्या दिशेने धावत्या बसमध्ये कोयत्याने सपासप वार, पोलिसांनी सांगितलं खळबळजनक कारण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement