Central Railway: दौंड-कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय, सोलापूरच्या प्रवाशांनाही फायदा, पाहा अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Daund Kalaburagi Train: मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता दौंड सोलापूर कलबुर्गी विशेष रेल्वे फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार आहे.
सोलापूर – दौंड-कलबुर्गी मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने खूशखबर दिली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, कामगारांची ये-जा, वाढती मागणी लक्षात घेऊन दौंड-कलबुर्गी या अनारक्षित विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे-दौंड-सोलापूर-कलबुर्गी या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष रेल्वे गाडी
गाडी क्रमांक 01421/01422 दौंड-कलबुर्गी अनारक्षित दैनिक विशेष गाडी मध्य रेल्वेने यापूर्वी 1 डिसेंबर 2025 पर्यंत आठवड्यातून पाच दिवस सुरू केली होती. गुरुवार आणि रविवार वगळता ही गाडी नियमित चालवली जाते. आता प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही गाडी सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे गुरुवार आणि रविवार वगळून आठवड्यातील पाच दिवस ही गाडी धावणार आहे.
advertisement
दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष रेल्वेच्या येत्या काळात एकूण 126 फेऱ्या होणार आहेत. ही गाडी व्यापारी वर्ग, कामगार, विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने फेऱ्यांचा विस्तार प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडी
गाडी क्रमांक 01425/01426 दौंड-कलबुर्गी द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडी यापूर्वी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत धावणार होती. आता ही गाडी 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत दर गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. दौंड-कलबुर्गी द्वि-साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे गाडीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
दौंड-कलबुर्गी विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये, रचनेमध्ये आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटासह प्रवास करण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच अनारक्षित कोचसाठी स्थानकावर बुकिंग काउंटर आणि युटीएस द्वारे देखील बुकिंग करता येणार आहे. तसेच या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा NTES APP वर जाऊन माहिती घेता येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 03, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Central Railway: दौंड-कलबुर्गी रेल्वेबाबत मोठा निर्णय, सोलापूरच्या प्रवाशांनाही फायदा, पाहा अपडेट


