Solapur Crime : बार्शीत जिच्या विरहात माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Barshi Former Deputy Sarpanch Case : पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंदने पुजाच्या घरासमोर गाडी उभा करून टोकाचं पाऊल उचललं.
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. हा तरुण बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचा माजी उपसरपंच होता. विवाहबाह्य संबंधातून या तरुणाने असं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. गोविंद बर्गे असं या माजी उपसरपंचाचं नाव आहे. अशातच आता जिच्यासाठी गोविंदने आत्महत्या केली ती पुजा गायकवाड आहे कोण? जाणून घ्या.
नर्तिकेच्या प्रेमात वेडा
विवाहबाह्य संबंधातून तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. गोविंद कला केंद्रातील (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे गोविंदने पुजाच्या घरासमोर गाडी उभा करून टोकाचं पाऊल उचललं.
advertisement
पुजा गायकवाड कोण?
पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती 21 वर्षांची आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या अन् दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर पुजाने खरे रंग दाखवले. पुजाने मोठी मालमत्ता आपल्या आणि कुटूंबाच्या नावे केली. गोविंदने लाखो रूपये पुजावर उधळले. पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर तिच्या नाचण्याचे अनेक रिल्स शेअर करायची.
advertisement
21 वर्षांची पुजा गायकवाड ही अल्लड असली तरी तिने गोविंदकडून बक्कल मालमत्ता घेतली होती. पुजाने वेळोवेळो पैसे, सोने नाणे, मावशीचे आणि नातेवाईकाचे नावावर प्लॉट, जमीन यापूर्वी नावावर घेवून दिली होती, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच पुजा बंगला नावावर करण्यासाठी हट्ट करत होती. याचमुळे गोविंदने आयुष्य संपवलं होतं.
दरम्यान, गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने पूजा गायकवाड हिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 10, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : बार्शीत जिच्या विरहात माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?