Solapur-Vijaypur Highway: सोलापुरातून मोठं अपडेट! विजापूर महामार्गावरील वाहतूक 3 दिवसानंतर पुन्हा सुरू
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur – Vijaypur Highway: सीना नदीत कोळेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सोलापूर विजयपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता 3 दिवसानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
सोलापूर - मुसळधार पाऊस आणि सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. सीना कोळेगाव धरणातून 1 लाख 45 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात आला होता. यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावर महापुराचे पाणी आल्याने महामार्ग पुन्हा ठप्प झाला होता. 29 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला हा महामार्ग 3 दिवसानंतर पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पावसाने धुमशान घातले. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून 1 लाख 45 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला होता. आज सकाळी पाण्याची पातळी कमी झाल्याने तब्बल 3 दिवसानंतर सोलापूर - विजयपूर महामार्ग सुरू झाला असून एकेरी मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे. 3 दिवस हा महामार्ग बंद असल्याने महामार्ग सुरू होताच वाहनांच्या लांब लांब रांगा दिसत आहे.
advertisement
दरम्यान, सीना कोळेगव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने सीना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बॅरॅकेट्स लावून सोमवार 29 सप्टेंबर रोजी हा महामार्ग बंद केला होता. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला आलेले पाणी कमी झाले. त्यामुळे महामार्ग 3 दिवसानंतर सुरू करण्यात आला असून वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. वाहतुकीची गर्दी झाल्याने वाहनधारकांनी आपली वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Oct 01, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur-Vijaypur Highway: सोलापुरातून मोठं अपडेट! विजापूर महामार्गावरील वाहतूक 3 दिवसानंतर पुन्हा सुरू











