Solapur News: ऐन पावसाळ्यात जलसंकट, सोलापूरला आता 4 नव्हे 5 दिवसआड पाणी, कारण काय?

Last Updated:

Solapur News: सोलापूरकरांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. आता ऐन पावसाळ्यात सोलापुरात 5 दिवसआड पाणी मिळणार आहे.

Solapur News: ऐन पावसाळ्यात जलसंकट, सोलापूरला आता 4 नव्हे 5 दिवसआड पाणी, कारण काय?
Solapur News: ऐन पावसाळ्यात जलसंकट, सोलापूरला आता 4 नव्हे 5 दिवसआड पाणी, कारण काय?
सोलापूर: सध्या पावसाळा सुरू असला तरी सोलापूरकरांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. आजपासून (26 जून) शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर जाणार आहे. मुख्य जुन्या पाइपलाइनवरील व्हॉल्वचे टेलपिस नादुरुस्त झाले असून ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा रोटेशन एक दिवस उशिरा होणार असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिलीये.
पंप बंद राहणार
मुख्य पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी उजनी आणि पाकणी येथील पंप बंद राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून पाण्याचा उपसा होणार नाही. दुरुस्ती कामासाठी जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे भवानी पेठ पंपगृहावर अवलंबून असलेल्या परिसरात गुरुवारी, 26 जून रोजीचा पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ आणि कमी दाबाने होईल.
advertisement
5 दिवसआड पाणीपुरवठा
सध्या सोलापूर शहर परिसरात चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. आता एक रोटेशनसाठी एक दिवस उशिरा होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना पाणी जपून वापरावं लागेल. गैरसोय टाळण्यासाठी शहरवासियांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: ऐन पावसाळ्यात जलसंकट, सोलापूरला आता 4 नव्हे 5 दिवसआड पाणी, कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement