Chakan Traffic : अतिक्रमण हटवले पण फरक शून्य! चाकणमध्ये ट्रॅफिक जाम कायम, नागरिक संतापले

Last Updated:

Chankan Traffic Jam Update : चाकणमध्ये प्रशासनाने अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई केल्याचा दिखावा केला, मात्र प्रत्यक्षात वाहतुकीची कोंडी जसाची तशीच राहिली. मुख्य महामार्ग आणि आंबेठाण मार्गावर तीन तास वाहतूक ठप्प होती.

News18
News18
चाकण : चाकणमधील मुख्य महामार्ग आणि आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या नेहमीचीच आहे. प्रशासनाने गेल्या काही वर्षांत अनेक वेळा अतिक्रमणे हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वास्तव असा की, समस्या अजूनही जसाची तशी आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली पुन्हा अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. रस्त्यावरच्या कामांना अडथळा न येण्यासाठी ही कारवाई होत असली, तरी नागरिकांना वाटते की ती फक्त दिखाव्याची कारवाई आहे.
गेल्या काही वर्षांत चाकणमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. पोलिस आयुक्त, PMRDA आयुक्त, उपवाहतूक आयुक्त, एनएचएआय, स्थानिक आमदार, खासदार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भागातील वाहतूक परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले, परंतु प्रत्यक्षात अडथळे दूर करणे कठीण ठरले आहे.
अतिक्रमण हटवले तरी, रस्त्यावरील दुरुस्तीचे काम अजून पूर्ण झालेलं नाही तसेच विजेचे खांब लावलेले नाहीत शिवाय अनेक ठिकाणी खडे तसेच राहिलेले आहेत. यामुळे वाहतूक पुन्हा रखडली जाते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
चाकण भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती गंभीर ठरली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव-शिक्रापूर रोड आणि चाकण-आंबेठाण मार्गावर प्रवास करताना नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. स्थानिक लोक, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी निदर्शने करून प्रशासनाकडे या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
चाकणमधील अतिक्रमण कारवाई नागरिकांसाठी फक्त दृश्यात्मक ठरली आहे, प्रत्यक्षात वाहतूक सुधारण्यात ती अपयशी ठरत आहे. रस्त्यांची पूर्ण कामे करणे आणि अडथळे दूर करणे आवश्यक आहे, नाहीतर नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत राहील.
मराठी बातम्या/पुणे/
Chakan Traffic : अतिक्रमण हटवले पण फरक शून्य! चाकणमध्ये ट्रॅफिक जाम कायम, नागरिक संतापले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement