Hotel Bhagyashree: नाही पाहावलं! हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक, मालकाने सांगितलं कुणी केलं!

Last Updated:

नाद करतो काय?..यायला लागतंय..' म्हणत सोशल मीडियावर व्हायरल झालेले धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलची राज्यात जोरदार चर्चा आहे.

hotel bhagyashree
hotel bhagyashree
बालाजी निरफळ, प्रतिनिधी
धाराशिव: 'नाद करतो काय?..यायला लागतंय..' म्हणत सोशल मीडियावर व्हायरल झालेले धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलची राज्यात जोरदार चर्चा आहे. हॉटेल चालवून आपल्या बायकोला फॉर्च्युनर एसयूव्ही गिफ्ट केल्यानंतर नोकरदार वर्गापासून ते उद्योजक अवाक् झाले होते. मागील काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्रीबद्दल बरीच चर्चा सुरू असताना काही अज्ञात लोकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
advertisement
‘नाद करतो काय?’ या टॅगलाइनने प्रसिद्ध झालेलं तुळजापूरचं हॉटेल भाग्यश्री पुन्हा चर्चेत आलंय. २५० रुपयांची जबरदस्त मटण थाळी मिळणाऱ्या या हॉटेलवर रविवारी अचानक दगडफेक झाली. हॉटेल बंद असताना समाजकंटकांनी मोठं नुकसान केलं, त्यामुळे हॉटेल मालक संतप्त झाला आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by JAGDISH JADHAV (@jj_bhauu)



advertisement
भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. 250 रुपयांमध्ये मटण थाळी अन् अनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत चव असलेल्या हॉटेल भाग्यश्रीने धाराशिवमध्ये धुरळा उडवला.  भाग्यश्री हॉटेलवर जेवण्यासाठी रांगाच्या रांगा लागतात. दिवसभरात 10 ते 12 बोकड कापले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे हॉटेलवर चांगली गर्दी जमत आहे. पण आता या हॉटेलवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे. अज्ञात तरुणांनी हॉटेलवर दगडफेक केली. त्यामुळे रविवारी हॉटेल बंद होतं. त्यानंतर सोमवारी हॉटेल मालक नागेश मडके यांनी  याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. 'हॉटेल भाग्यश्री.. आज ९ तारीख आहे. काल बंद होतं. आज उघडणार होतो, परंतु रात्री दगडफेक झाली. बॅनरची तोडफोड करण्यात आली.  यामध्ये बोर्डचं नुकसान केलं आहे. त्यामुळे हॉटेल बंद ठेवावं लागलं. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे, पोलीस पुढील कारवाई करतील, अशी माहिती मडके यांनी दिली.
advertisement
advertisement
बायकोला गिफ्ट केली फॉर्च्युनर
विशेष म्हणजे, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी आपल्या बायकोला  फॉर्च्युनर कार गिफ्ट केली होती. फॉर्च्युनरची किंमत ही ४० ते ५० लाख इतकी आहे. त्यामुळे एका हॉटेल मालकाने आपल्या बायकोला फॉर्च्युनर कार गिफ्ट केल्यामुळे सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला.  त्यानंतर हॉटेलमध्ये आणखीनच गर्दी वाढली आहे. मात्र, अशाच हॉटेलवर हल्ला झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच परिसरातील इतर मराठी हॉटेल मालकांनी मडके यांना पाठिंबा दिला आहे. मराठी माणूस व्यवसायात उतरला, त्यांच्यावर असा हल्ला होत असेल तर निषेध व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hotel Bhagyashree: नाही पाहावलं! हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक, मालकाने सांगितलं कुणी केलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement