लई झाक! 20 गुंठ्यात शेतकऱ्याने फळभाज्यांमधून कमावले लाखोंचे उत्पन्न; शेतीत केला भन्नाट जुगाड
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. पारंपरिक पिके घाटाचा सौदा ठरत असल्याने नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. पारंपरिक पिके घाटाचा सौदा ठरत असल्याने नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जालना जिल्ह्यातील मांडवी येथील एका उच्चशिक्षित तरूणाने शिमला मिरचीच्या शेतीतून केवळ 20 गुंठ्यात 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. पाहुयात या तरूण शेतकऱ्यांची यशोगाथा…
मांडवी येथील नारायण चंद यांनी एम ए राज्यशास्त्र शिक्षण घेतले आहे. नोकरीच्या संधी मर्यादित असल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. 17 जुलैला त्यांनी नेटच्या शेडमध्ये मल्चिंग पेपर आंथरून बेडवर इंडस 11 या वाणाची लागवड झिगझॅग पद्धतीने केली. तत्पूर्वी, मातीची चांगली मशागत आणि शेणखत दिले. वेगवेगळ्या पद्धतीने किड रोगाचे व्यवस्थापन केले. तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिली. आता त्यांच्या शेतातील शिमला मिरचीचे पीक बहरात आले आहे.
advertisement
आतापर्यंत या मिरचीची पाच ते सहा तोडे झाले आहेत. यामधून साडेपाच टन उत्पादन मिळाले असून आणखी पाच ते सहा टन उत्पादन त्यांना मिळणार आहे. मिरचीला ला बाजारात सरासरी 50 रू किलो असा दर मिळत आहे. यामाध्यमातून त्यांना आतापर्यंत अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. तरूण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतात नवीन प्रयोग करावे. पारंपरिक पिके न घेता नवीन पिके घेऊन उत्पादन वाढवावे असं आव्हान नारायण चंद यांनी युवा शेतकरी यांना केलं आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 29, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लई झाक! 20 गुंठ्यात शेतकऱ्याने फळभाज्यांमधून कमावले लाखोंचे उत्पन्न; शेतीत केला भन्नाट जुगाड

