ओबीसींचे २७ टक्के आरक्षण पूर्ववत, ४ आठवड्यात नोटिफिकेशन, महापालिका निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Local Body Election: मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या सर्व निवडणुका होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मुंबई : मुंबई ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मागील जवळपास अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या असून राज्यात प्रशासक राज सुरू असल्याची टीका करण्यात येत होती. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, तसेच चार महिन्याच्या आत निवडणुका पार पाडा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत 2022च्या आधीची परिस्थिती होती,ती परिस्थिती कायम ठेवावी असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे २७ टक्के आरक्षण पूर्ववत करण्यात येऊन पुढील चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नोटिफिकेशन काढण्यात यावे. तसेच राज्यात पुढील ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
advertisement
चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळं आता निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर करावा लागणार असून चार महिन्यात निवडणुका होणार हे निश्चित झालंय...त्यामुळं राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 9:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ओबीसींचे २७ टक्के आरक्षण पूर्ववत, ४ आठवड्यात नोटिफिकेशन, महापालिका निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजणार