आधी अब्रूचे लचके तोडले, मग शिक्षकाने विद्यार्थिनीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, 16 वर्षीय मुलीचा करूण अंत!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने एका १६ वर्षीय मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला.
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने एका १६ वर्षीय मुलीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित विद्यार्थिनी गर्भवती राहिली असता, आरोपीनं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी एका खासगी कोचिंग क्लासला जायची. त्याच कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केला. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीतून त्याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या अधिक प्रमाणात खाल्ल्याने प्रकृती बिघडल्यानंतर तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
संदेश गुंडेकर (२७, रा. ढाणकी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचा उमरखेड तालुक्यात कोचिंग क्लास आहे. पीडित विद्यार्थिनी गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडे शिकवणीसाठी येत होती. गुंडेकर याने तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. गुंडेकर याने बदनामी होऊ नये म्हणून चार महिन्यांच्या गर्भवती विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा डोस अधिक झाल्याने तिची प्रकृती बिघडली.
advertisement
अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिला पुसदच्या खासगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे अवैध गर्भपाताचे प्रकरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच याची माहिती पुसद पोलिसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक पथकासह रुग्णालयात आले. त्यांनी मुलीचा जबाब नोंदवून घेऊन शिक्षक गुंडेकर याच्याविरोधात रविवारी रात्री पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडितेची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला नांदेड शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
Location :
Umarkhed,Yavatmal,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी अब्रूचे लचके तोडले, मग शिक्षकाने विद्यार्थिनीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, 16 वर्षीय मुलीचा करूण अंत!