मनोरूग्णांच्या संख्येत ठाणे अव्वल, मुंबई- पुणे किती क्रमांकावर? वाचा यादी...

Last Updated:

कोरोना काळानंतर मनोरूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2022 पासून मनोरूग्णांच्या संख्येमध्ये दरवर्षी काही टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे. सर्वाधिक मनोरूग्ण कोणत्या शहरामध्ये आहे? जाणून घेऊया...

मनोरूग्णांच्या संख्येत ठाणे अव्वल, मुंबई- पुणे किती क्रमांकावर? वाचा यादी...
मनोरूग्णांच्या संख्येत ठाणे अव्वल, मुंबई- पुणे किती क्रमांकावर? वाचा यादी...
बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग, स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड, ऑफिसच्या कामाचा आणि कुटुंबाचं टेन्शन या सर्व गोष्टींमुळे माणसाचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. या सर्व कारणांनी येणार्‍या चिंतेमुळे मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये झपाट्याने मानसिक रोगाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना काळानंतर मनोरूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2022 पासून मनोरूग्णांच्या संख्येमध्ये दरवर्षी काही टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे. सर्वाधिक मनोरूग्ण कोणत्या शहरामध्ये आहे? जाणून घेऊया...
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रूग्णालयांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 32 लाखांवर पोहोचली आहे. ही संख्या प्रादेशिक मनोरूग्णालयांमधील रूग्णांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथे मनोरूग्णालयांबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रूग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे. या चार मनोरूग्णालयांमध्ये तीन वर्षांमध्ये 5 लाख 6 हजार 555 इतक्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
यामध्ये, 2022- 23 मध्ये 1 लाख 37 हजार 939 रूग्णांवर उपचार करण्यात आले. तर, 2023- 24 मध्ये 1 लाख 80 हजार 543 पर्यंत रूग्णांची संख्या पोहोचली होती. आणि 2024- 25 साली 1 लाख 88 हजार 080 रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. हा आकडा दरवर्षी काही हजारांनी पुढे सरकताना दिसत आहे. मनोरूग्णालयांमध्ये सर्वाधिक उपचार घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या उपचारामध्ये 1 लाख 56 हजार 246 मनोरूग्णांचा समावेश आहे. खरंतर, हा आकडा धडकी भरवणारा आहे.
advertisement
ठाण्यानंतर नागपूरमध्ये 1 लाख 45 हजार 636 मनोरूग्णांवर उपचार, पुण्यामध्ये 1 लाख 21 हजार 823 मनोरूग्णांवर उपचार आणि रत्नागिरीमध्ये 82 हजार 850 मनोरूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ह्या सर्व मनोरूग्णांची संख्या बाह्यरूग्ण विभागातली आहे. राज्यामध्ये फक्त मनोरूग्णांचीच नाही तर, स्मृतिभ्रंश रूग्णांमध्येही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. स्मृतिभ्रंश आजाराची समस्या सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. अनेक जिल्हा रूग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिकची सुरूवात करण्यात आली आहे. स्मृतिभ्रंशच्या रूग्णांमध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोरूग्णांच्या संख्येत ठाणे अव्वल, मुंबई- पुणे किती क्रमांकावर? वाचा यादी...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement