उद्या SP ला बोलवा, PI ला इन्व्हेस्टिगेशन शब्द बोलता येत नाही, हे काय युक्तिवाद करणार? न्यायाधीशांनी झापलं

Last Updated:

Shankar Patole Bribe Case: पाटोळे लाच प्रकरणात पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुनावणीला पाठवा, असे निर्देश न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दिले.

शंकर पाटोळे लाचखोर उपायुक्त
शंकर पाटोळे लाचखोर उपायुक्त
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या २५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत झाप झाप झापले. इन्व्हेस्टिगेशन हा शब्द ज्या पोलीस निरीक्षकाला उच्चारता येत नाही, तो काय या प्रकरणात युक्तिवाद करणार? असा सवाल करीत उद्याच्या सुनावणीला पोलीस निरीक्षकाला पाठवू नका, जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवा नाहीतर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशाराच सत्र न्यायाधीशांनी दिला.
२५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अन्य दोन सहकार्‍यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. परंतु अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे हे रजेवर गेल्याने सुनावणी एक दिवस लांबणीवर पडली. आज गुरुवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुनावणीला पाठवा, असे निर्देश न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दिले.
advertisement

कोर्टातील संवाद, न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना झापले

न्यायाधीश - शंकर पाटोळे यांचा मोबाईल फॉरेन्सिक चाचणीकरीता पाठवलाय का?
तपास अधिकारी - हो, पाठवलाय
न्यायाधीश - कारवाईचे डिटेल्सची मला माहिती पाहिजे
तपास अधिकारी - व्हॉट्सॲप कॉलची चौकशी करायची आहे
न्यायाधीश - तुम्ही पोलिस इन्सपेक्टरला का पाठवले? उद्या पोलीस अधीक्षकांना बोलवा नाहीतर तुमच्यावर कारवाई करावी लागेल
advertisement
न्यायाधीश- व्हॉट्सॲप कॉलची हिस्ट्री बघितली का?
तपास अधिकारी - मुंबई विभागाने कारवाई केली आणि सगळे जमा केले आहे
न्यायाधीश - यांना इन्व्हेस्टिगेशनबाबत पण व्यवस्थित बोलता येत नाहीये, त्यांच्याकडे तपास दिला आहे, उद्याच्या उद्या पोलीस अधीक्षकांना बोलवा, हे प्रकरण गांभीर्याने घ्या, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध गांभीर कारवाई करेन, मुंबईवाल्यांनी काय गोंधळ घातला आहे ते मला बघावे लागेल, उद्या कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप कॉल डिटेल घेऊन या. इन्व्हेस्टिगेशन हा शब्द पीआयला बोलत येत नाही, हा आमच्या समोर युक्तिवाद करणार का?
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्या SP ला बोलवा, PI ला इन्व्हेस्टिगेशन शब्द बोलता येत नाही, हे काय युक्तिवाद करणार? न्यायाधीशांनी झापलं
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement