आशिया कपच्या ट्रॉफीवर फुदकणारा नक्वी पळाला, एका सेकंदात बोलती बंद, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चा प्रमुख मोहसिन नक्वी याने आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर भाष्य करायला नकार दिला आहे.
मुंबई : आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चा प्रमुख मोहसिन नक्वी याने आशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर भाष्य करायला नकार दिला आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने दुबईमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं, पण फायनलनंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला.
पाकिस्तानचा गृहमंत्री असलेला नक्वी स्टेडियममधून ट्रॉफी आणि विजेत्या खेळाडूंची पदकं हॉटेलमध्ये घेऊन गेला, त्यामुळे भारतीय टीमला औपचारिकपणे ट्रॉफी देण्यात आली नाही. मीडियामध्ये समोर आलेल्या वृत्तानुसार आशिया कपची ट्रॉफी आता एमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडे आहे. पण ट्रॉफी भारताला कधी आणि कशी सुपूर्द केली जाईल, हे स्पष्ट झालेलं नाही.
अबरारच्या रिसेप्शनमध्ये नक्वीला प्रश्न
advertisement
पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमदच्या लग्नाच्या रिसेप्शनला मोहसिन नक्वी उपस्थित होता, तेव्हा त्याला पाकिस्तानी मीडियाकडून आशिया ट्रॉफीबद्दल प्रश्न विचारला गेला. टाईम्स ऑफ कराचीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नक्वी मीडियाच्या प्रश्नांना टाळून गाडीच्या दिशेने गेला. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी नक्वीला गाडीकडे घेऊन गेला.
Chairman PCB & Asian Cricket Council President Moshin Naqvi, faced questions about the ACC trophy controversy during Abrar Ahmed’s valima in Karachi. Here’s his response.#AsiaCup2025 #Karachi #TOKSports pic.twitter.com/788xkFa0ka
— TOK Sports (@TOKSports021) October 6, 2025
advertisement
प्रश्न ऐकून नक्वी पळाला
पत्रकाराने नक्वीला आशिया कप ट्रॉफीबद्दल प्रश्न विचारला, पण याचे उत्तर न देताच नक्वी तिथून पळाला. नक्वीला आता त्याच्या देशातीलच पत्रकार ट्रॉफीबद्दल प्रश्न विचारत आहेत, पण आशिया कपमध्ये धमकीची भाषा करणारा नक्वी आता मात्र मौन बाळगून आहे.
बीसीसीआय आयसीसीकडे जाणार
दरम्यान भारतीय टीमला ट्रॉफीपासून दूर ठेवल्यामुळे बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करणार आहे. नक्वीने आचारसंहितेचा भंग केला असून स्वत:च्या कर्तव्याचं उल्लंघन केलं आहे, यामुळे क्रिकेट प्रशासनाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे, असा आरोप बीसीसीआयने केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 5:42 PM IST