Sameer Wankhede: 'मी छोटा माणूस...' आर्यन खान वादावर काय म्हणाले समीर वानखेडे?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sameer Wankhede vs Shah Rukh Khan: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सर्वात जास्त चर्चेत आलेले नाव म्हणजे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सर्वात जास्त चर्चेत आलेले नाव म्हणजे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. 2021 मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्ज केसनंतर त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचे वक्तव्य आणि त्यांच्यावर झालेले आरोप हे सगळं बॉलिवूडसाठी वादळासारखं ठरलं होतं. आता पुन्हा एकदा वानखेडे चर्चेत आहेत, पण यावेळी एका वेगळ्या कारणासाठी. नेटफ्लिक्सच्या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' या मालिकेवर त्यांनी घेतलेला आक्षेप.
समीर वानखेडे यांनी या 'बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या शोमध्ये त्यांचं “खोटं आणि अपमानास्पद चित्रण” करण्यात आलं आहे. समीर वानखेडे म्हणाले, "हा खटला वैयक्तिक शत्रुत्वाचा नाही, तर माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी कायद्याचा अधिकारी आहे आणि मी नेहमी नियमांनुसार वागलो आहे. माझं कोणाशी वैर नाही."
advertisement
2021 मध्ये शाहरुख खानसोबतचे चॅट्स लीक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र वानखेडे यांनी हे दावे फेटाळले. ते म्हणाले, 'मी ते चॅट्स न्यायालयात सादर करणार होतो, मग मी ते लीक का करू? माझ्याकडे 65B प्रमाणपत्र आहे जे पुरावा म्हणून सादर केलं जातं. कायदेशीर प्रक्रियेनुसारच मी सगळं केलं."
advertisement
ऑक्टोबर 2021 मध्ये एनसीबीने क्रूझ शिपवर छापा टाकला होता. त्यात आर्यन खान आणि काही इतरांना अटक झाली होती. आर्यनने जवळजवळ तीन आठवडे तुरुंगात घालवले आणि शेवटी पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका झाली. यानंतर खान कुटुंबाने वानखेडेंवर लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला. परिणामी, सीबीआयने मे 2023 मध्ये वानखेडेंविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला. वानखेडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले.
advertisement
शाहरुख खानशी वैयक्तिक वैर असल्याच्या चर्चांना उत्तर देताना वानखेडे म्हणाले, "मी खूप छोटा माणूस आहे, एक सरकारी नोकर. कोणाची वैर ठेवायची मला गरज नाही. आपण कायद्याच्या देशात राहतो, कुणाच्या विरोधात व्यक्तिगत सूड ठेवण्याचा प्रश्नच येत नाही."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sameer Wankhede: 'मी छोटा माणूस...' आर्यन खान वादावर काय म्हणाले समीर वानखेडे?