एकीकडे नाईक, दुसरीकडे आव्हाड, ठाण्यात एकनाथ शिंदे यांना घेरणार, मनसेचीही साथ

Last Updated:

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील त्यांच्या नाद या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. याच बैठकीची चित्रफित जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली.

जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सत्तापक्षातील नेते, मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात आव्हान उभे केलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांची मोट बांधली आहे. विशेष म्हणजे महायुती विरोधात महाविकास आघाडीने उचललेल्या पावलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पाठिंबा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील त्यांच्या नाद या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. याच बैठकीची चित्रफित जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसे नेते अविनाश जाधव उपस्थित होते.

आघाडीसह मनसे एकत्र लढणार?

advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तसेच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसह मनसे एकत्र लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी करणारी पहिली बैठक आव्हाड यांच्या निवासस्थानी झाली. एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्यासाठी तसेच भाजपचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन लढावे. महायुतीला एकीचे बळ दाखवून देऊ, अशी रणनीती बैठकीत आखण्यात आल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीच्या साथीला मनसे

advertisement
गेल्या तीन वर्षात महाविकास आघाडीने शक्य तितक्या ताकदीने महायुतीशी दोन हात केले. परंतु सत्तेपुढे विरोधकांचा फारसा टिकाव लागला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या साथीला राज ठाकरे आल्याने ठाण्यातील स्थानिक समीकरणे देखील बदलून गेली आहेत. महाविकास आघाडीला मनसेची साथ मिळाल्याने लोकांच्या ज्वलंत प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी निकराने लढाई लढता येईल, जेणेकरून महापालिकेत चांगली वातावरण निर्मिती होईल, असा अंदाज आहे
advertisement

गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपचे एकनाथ शिंदे यांना आव्हान

भाजप नेते मंत्री गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ले चढवत आहेत. ठाण्यात चुकीच्या माणसाच्या हातात सूत्रे गेली असे सांगून एकनाथ शिंदे यांना हटविण्यासाठी तसेच त्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न अत्यंत कसोशीने नाईक करीत आहेत. जनता दरबाराच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे अपयश नाईक ठळकपणे अधोरेखित करीत आहेत. याकामी वरिष्ठ स्तरावरूनही नाईक यांना आशीर्वाद मिळत असल्याचे होम ग्राऊंडवरच शिंदे यांची अडचण वाढली आहे. शिवसेना-भाजपमधील अंतर्गत शीतयुद्ध याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. ठाणे महापालिका निवडणुकीतच शिंदे अडकून राहावेत किंबहुना ठाण्यातच त्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल, अशी रणनीती भाजप आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकीकडे नाईक, दुसरीकडे आव्हाड, ठाण्यात एकनाथ शिंदे यांना घेरणार, मनसेचीही साथ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement