BMW कारमधून अंमली पदार्थांची तस्करी, गाडीवर ठाणे मनपाचा लोगो, आरोपींचे राजकीय कनेक्शन

Last Updated:

Thane Police: ठाणे पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थ तस्करी कारवाईत ⁠महागड्या बीएमडब्लू कारमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला. ⁠

ठाणे  पोलीस
ठाणे पोलीस
अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : ठाणे महापालिकेचा लोगो बीएमडब्ल्यू कारवर वापरून अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. याची भणक ठाणे पोलिसांना लागल्यावर भिवंडी येथून ३२ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
भिवंडीतून हे अंमली पदार्थ विविध मार्गे पाठवले जाणार होते. ⁠अवजड मालवाहतुकीच्या आड अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. तसेच यामध्ये आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यताही ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे.
ठाणे पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थ तस्करी कारवाईत ⁠महागड्या बीएमडब्लू कारमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला. ⁠तस्करी करीता वापरण्यात आलेल्या महागड्या बीएमडब्लू गाडीवर ठाणे मनपाचा लोगो आहे. ⁠पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे राजकीय कनेक्शन देखील आहे.
advertisement
⁠आरोपी तनवीर अहमद अंसारी आणि आरोपी महेश देसाई यांना पोलिसांनी अटक केली आहे. तनवीर याच्यावर याआधी अंमली पदार्थ तस्करीचे दोन गुन्हे दाखल आहेत. ⁠तर महेश देसाई याच्यावर अंमली पदार्थ तस्करीसह मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. ⁠तनवीर हा मुंब्र्याचा रहिवाशी आहे तर महेश देसाई हा कोल्हापूर येथील आजरा येथील रहिवाशी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMW कारमधून अंमली पदार्थांची तस्करी, गाडीवर ठाणे मनपाचा लोगो, आरोपींचे राजकीय कनेक्शन
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement