ठाणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील 15 दिवस माजिवाडा उड्डाणपूल राहणार बंद, वाहतुकीत मोठे बदल

Last Updated:

Thane News: ठाण्यात 5 एप्रिलपासून येथील माजिवडा मेट्रो स्थानकाच्या छताचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे १५ दिवस माजिवाडा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहे.

News18
News18
ठाणे: ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात सध्या वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो-चार प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आलं आहे. 5 एप्रिलपासून येथील माजिवडा मेट्रो स्थानकाच्या छताचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून नाशिक आणि घोडबंदर रोडच्या दिशेने होणारी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पुलाखालील मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. या बदलांमुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शिवाय रात्रीच्या सुमारास या भागातून अवजड वाहनांची वाहतूक होत असते, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे वाहतूक शाखेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाशेजारील ज्युपिटर रुग्णालयाजवळ माजिवडा मेट्रो स्थानकाचे काम सुरू असून त्यावर छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. या कामादरम्यान जॅक बीम टाकून त्यावर राफ्टर उभारले जाईल. हे काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या साह्याने होणार आहे. रात्री १० वाजता ही क्रेन ज्युपिटर रुग्णालयासमोरील माजिवडा उड्डाणपुलाच्या चढणीवर उभी करण्यात येणार आहे. पहाटे ५ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या पुलावरून घोडबंदर रोड व नाशिककडे जाणारी सर्वच प्रकारची वाहने पुलाखालील मार्गिकेवरून पुढे जातील, असे ठाणे वाहतूक शाखेच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
या पर्यायी मार्गांचा वापर
मुंबईकडून नाशिक आणि घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने रात्री १० वाजल्यानंतर माजिवडा उड्डाणपुलावरून न जाता, पुलाखालून कापूरबावडी सर्कल येथून पुढे मार्गक्रमण करतील. पण यामुळे कापूरबावडी सर्कलवर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. याचा कॅडबरी जंक्शनपर्यंत परिणाम होऊन या ठिकाणीही कोंडी होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील 15 दिवस माजिवाडा उड्डाणपूल राहणार बंद, वाहतुकीत मोठे बदल
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement