Ganeshotsav 2025 : स्टेशन बाहेर फेरीवाल्यांचा त्रास; ठाकुर्लीच्या गड्याने थेट बाप्पाच्या आरासाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले

Last Updated:

Ganeshotsav 2025 : ठाकुर्ली आणि इतर शहरांतील रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.या परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी लाडक्या बाप्पाच्या आरासाच्या माध्यमातून प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

News18
News18
डोंबिवली : कल्याण, डोंबिवली, घाटकोपर, कुर्ला, दादर, बोरिवली आणि इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवर फेरीवाल्यांचा त्रास नागरिकांसाठी मोठ्या समस्येचे रूप धारण करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानकांपासून 150 मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना  बसवू नयेत, असा आदेश दिला असूनही फेरीवाले या नियमाचे पालन करत नाहीत. परिणामी प्रवाशांना, चाकरमानींना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
advertisement
या परिस्थितीवर पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकुर्लीतील जागृत रहिवासी रुपेश राऊत आणि त्यांचे मित्रमंडळी पुढे आले आहेत. त्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी एक विशेष आरास सजवली आहे. या आरासातून ते प्रशासनाचे डोळे उघडे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रवाशांना, नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत जनजागृती करीत आहेत.
advertisement
आरासामध्ये स्टेशन बाहेरील फेरीवाल्यांनी ताबडतोब उभारलेल्या अतिक्रमणाचे चित्र तसेच फेरीवाल्यांचे व्यवस्थित न बसण्याचे प्रकार दाखवले आहेत. भाविकांची गर्दी या आरासाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. स्थानिक नागरिक म्हणतात की, हा आरास फक्त धार्मिक उत्सवापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये सामाजिक संदेशही आहे. रेल्वे स्थानके फेरीवाले मुक्त, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावीत.
advertisement
रुपेश राऊत यांनी सांगितले की, ''आमच्या गणपती सजावटीतून आम्ही बाप्पाकडे प्रार्थना करतो की स्थानकांवर फेरीवाल्यांचा अतिक्रमण थांबावा. तसेच रिक्षा आणि टॅक्सींसाठी विमानतळासारखी व्यवस्था असावी, जेणेकरून प्रवासी सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर पद्धतीने प्रवास करू शकतील.''
स्थानिक रहिवासी आणि नागरिक आता अपेक्षा करतात की, केडीएमसी पालिका, ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि प्रवाशांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण निर्माण करतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Ganeshotsav 2025 : स्टेशन बाहेर फेरीवाल्यांचा त्रास; ठाकुर्लीच्या गड्याने थेट बाप्पाच्या आरासाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement