Mumbai Traffic: LBS मार्गावरील वाहतूक कोंडी संपणार, कुर्ला-घाटकोपर आता थेट जोडणार, BMC चा मेगा प्लॅन काय?

Last Updated:

BMC LBS Road project Kurla to Ghatkopar : एलबीएस मार्गावरील कुर्ला ते घाटकोपरदरम्यान वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. बीएमसीच्या नव्या योजनेमुळे प्रवास होणार सुसाट आणि जलद होईल.

News18
News18
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या निर्णयानुसार कुर्ला एलबीएस रोडवरून घाटकोपरपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या पुलामुळे घाटकोपर-अंधेरी मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
या उड्डाणपुलाला लागणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. सध्या व्हीजेटीआय संस्थेमार्फत पुलाचा अभ्यास आणि सर्वेक्षण सुरू आहे. या अभ्यासात पुलाचा आराखडा, त्याचा रस्ते वाहतुकीवर होणारा परिणाम, वाहनचालकांना मिळणारा फायदा अशा विविध बाबींचा समावेश आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
advertisement
महापालिकेचा उद्देश आहे की येणाऱ्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधीच या पुलासाठी निविदा काढावी. या प्रकल्पात सर्वात मोठे आव्हान म्हणजे पुलाच्या मधल्या भागात असलेली नौदलाची जमीन होती. पुलापासून सुमारे 10 ते 12 मीटर अंतरावर नौदलाची जागा असल्याने त्यांनी सुरुवातीला आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे महापालिकेचे काम काही काळ थांबले होते. मागील दोन वर्षांपासून या संदर्भात महापालिका आणि नौदल यांच्यात अनेकदा पत्रव्यवहार झाला. अखेर नुकतेच नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
advertisement
कसा असेल हा उड्डाणपूल
एलबीएस रोडवरील कल्पना सिनेमागृहापासून ते घाटकोपर सर्वोदय रुग्णालयापर्यंत साडेतीन किलोमीटरचा हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. सध्या या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हा उड्डाणपूल घाटकोपर-अंधेरी लिंक रोडशी जोडला जाणार असून त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. प्रवास वेळेत मोठी बचत होईल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल.
advertisement
नौदलाची जागा पुलाच्या अगदी जवळ असल्याने सुरक्षा कारणास्तव पुलाच्या त्या भागात सहा मीटरपेक्षा उंच दर्जेदार संरक्षक जाळे किंवा पत्रे बसवण्याचा विचारही सुरू आहे. यामुळे नौदलाच्या जागेतील हालचाली बाहेरून दिसणार नाहीत आणि सुरक्षाही कायम राहील.
या उड्डाणपुलामुळे केवळ कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट होणार नाही तर संपूर्ण पूर्व उपनगरातील वाहतूक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामुळे मुंबईतील नागरिकांना अखेर वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Mumbai Traffic: LBS मार्गावरील वाहतूक कोंडी संपणार, कुर्ला-घाटकोपर आता थेट जोडणार, BMC चा मेगा प्लॅन काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement