दिवाळीत दोन दिवस अमावास्या, लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करायचं? ज्योतिषांनी दिला सल्ला
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Lakshmi Puja 2025 : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. “लक्ष्मीपूजन २० की २१ ऑक्टोबरला?” या प्रश्नावर अनेकजण गोंधळलेले दिसत आहेत.
दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. “लक्ष्मीपूजन २० की २१ ऑक्टोबरला?” या प्रश्नावर अनेकजण गोंधळलेले दिसत आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीत अशा प्रकारचा गोंधळ अधूनमधून निर्माण होतोच, मात्र यंदा सोशल मीडियामुळे तो आणखी वाढला आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त २१ ऑक्टोबर रोजीच आहे.
advertisement
दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनासाठी शुभ पुष्यामृत योग निर्माण होत आहे. अमावास्या सोमवारी, म्हणजेच १९ ऑक्टोबर दुपारी ३.४५ वाजल्यापासून सुरू होऊन २० ऑक्टोबर सायंकाळपर्यंत टिकणार आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठीही २० आणि २१ ऑक्टोबर हे दोन्ही दिवस शुभ मानले जात आहेत. ज्योतिषाचार्यांच्या गणनेनुसार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४२ ते रात्री ८.१४ या वेळेत लक्ष्मीपूजनासाठी सर्वाधिक मंगलमुहूर्त आहे.
advertisement
यंदा लक्ष्मीपूजनाच्या तारखेबाबत निर्माण झालेला गोंधळ हा काही पहिल्यांदाच नाही. मागील सहा दशकांत चौथ्यांदा असा योग आला आहे. १९६२ साली २८ ऑक्टोबर आणि १९६३ साली १७ ऑक्टोबर रोजी, तसेच अलीकडे २०२४ साली १ नोव्हेंबरला आणि आता २०२५ साली २१ ऑक्टोबरला अशा दोन दिवसांच्या अमावास्येचा योग आला आहे. भारतातील १०० पेक्षा अधिक पंचांग आणि कॅलेंडरमध्ये २१ ऑक्टोबर हीच लक्ष्मीपूजनाची तारीख दिलेली आहे.
advertisement
या गोंधळामागे उत्तर आणि दक्षिण भारतातील पंचांग गणनेतील भौगोलिक फरक कारणीभूत असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. अमावास्येची सुरुवात आणि समाप्ती यांतील सूक्ष्म बदलांमुळे काही भागांत एक दिवस आधी, तर काही भागांत दुसऱ्या दिवशी पूजन करण्याची परंपरा असते. त्यामुळे सोशल मीडियावरही या विषयावर विविध पोस्ट्स फिरत आहेत आणि त्यातूनच संभ्रम अधिक वाढला आहे.
advertisement
मोहन दाते (दाते पंचांग, सोलापूर) यांनी स्पष्ट केले की, “सोशल मीडियावर काही जण धर्मशास्त्रीय वचनांचा चुकीचा अर्थ घेत आहेत. लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबरलाच करणे योग्य आहे. या दिवशी पुष्यामृत योग असून, सायंकाळी ५.४२ ते ८.१४ या वेळेत पूजा केल्यास धनप्राप्ती आणि समृद्धीचे फल मिळते.”
advertisement
खरेदी आणि पूजनासाठी शुभ वेळ - दरम्यान, अमावास्येची सुरुवात १९ ऑक्टोबरला होत असली तरी २० ऑक्टोबरला सायंकाळी केलेली खरेदी आणि पूजनाची तयारी शुभ मानली जाते. बुधवारी, म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी ५.४२ ते ८.१४ या वेळेत लक्ष्मीपूजनाचा प्रमुख मुहूर्त असल्याने नागरिकांनी त्या वेळेत पूजन केल्यास अधिक शुभफल प्राप्त होईल.