IND vs WI : शुभमन गिलची चूक होती का? यशस्वी जयस्वालने कुणावर फोडलं खापर? म्हणतो 'क्रिझवर होतो तेव्हा...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs WI 2nd Test, Yashasvi Jaiswal : आऊट होणं किंवा नॉटआऊट राहणं हा खेळाचा भाग आहे. म्हणून त्या गोष्टी ठीक आहेत, असं यशस्वी जयस्वाल म्हणाला आहे.
Yashasvi Jaiswal On Run Out : दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल याने आक्रमक 175 धावांची खेळी केली. यशस्वीने दोन दिवस मैदानात बॅटिंग करत विक्रम रचला आहे. अशातच रनआऊटमुळे यशस्वीचं द्विशतक पूर्ण झालं नाही. अशातच आता यशस्वी जयस्वालने शुभमन गिलला दोषी ठरवलंय का? पाहा काय म्हणाला.
जर मी मैदानावर असलो तर...
माझं लक्ष्य हे दीर्घकाळ फलंदाजी करण्याचं आहे. मी नेहमीच शक्य तितका वेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. जर मी मैदानावर असलो तर मला खेळ चालू ठेवायचा आहे आणि शक्य तितका मैदानातून हटायचं नाही, असं जयस्वाल सामन्यानंतर म्हणाला. काही काही गोष्टी होतात तो सामन्याचा भाग आहे, असंही तो रनआऊटच्या प्रकरणावर म्हणाला.
advertisement
मी फक्त खेळात राहण्याचा प्रयत्न करतो
आऊट होणं किंवा नॉटआऊट राहणं हा खेळाचा भाग आहे. म्हणून त्या गोष्टी ठीक आहेत. मी काय साध्य करू शकतो आणि माझे आणि माझ्या संघाचे ध्येय काय आहे याची नेहमीच कल्पना सर्वांना असते. मी फक्त खेळात राहण्याचा प्रयत्न करतो आणि जर मी खेळात असलो तर मी खूप पुढं जाईन याची खात्री करतो, असं म्हणत त्याने यशस्वीला शुभमनचा बचाव केला.
advertisement
Yashasvi Jaiswal speaks on his runout #YashasviJaiswal#ShubmanGill #INDvWI pic.twitter.com/5UB0Rm74ow
— its Shruti (@Shruti_v31) October 11, 2025
जयस्वालने गेम प्लॅन सांगितला
मी आत येण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे पीचवर थोडी हालचाल होत होती, पण जेव्हा मी क्रीजवर होतो तेव्हा मला वाटत होते की कदाचित मी एक तास फलंदाजी करू शकेन आणि नंतर मला धावा काढणं सोपं होईल. विकेट अजूनही चांगली आहे, आम्ही खूप चांगली गोलंदाजी करत आहोत, आम्ही शक्य तितक्या लवकर त्यांच्यावर पोहोचण्याचा आणि त्यांना पुन्हा बाद करण्याचा प्रयत्न करू, असं म्हणत जयस्वालने गेम प्लॅन सांगितला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 7:34 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : शुभमन गिलची चूक होती का? यशस्वी जयस्वालने कुणावर फोडलं खापर? म्हणतो 'क्रिझवर होतो तेव्हा...'