रात्री सावज, दिवसा नोकरी! राष्ट्रीय महामार्गावर ‘सिनेस्टाईल’ दरोडा टाकणारे 12 जण पोलिसांच्या ताब्यात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नागपूर, भंडाऱ्याकडे जाणारे वाहनं बोगद्यात जाताच काही चोऱ्यांच्या टोळ्या प्रवाशांचे फोन आणि मौल्यवान वस्तू चोरून त्यांना मारहाण करायचे. महामार्गावरील पोलिसांनी 12 तासांच्या आता 12 चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
जर तुम्ही मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना जरा व्यवस्थित प्रवास तुम्हाला करावा लागणार आहे, कारण सध्या या रस्त्यावर चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. नागपूर, भंडाऱ्याकडे जाणारे वाहनं बोगद्यात जाताच काही चोऱ्यांच्या टोळ्या प्रवाशांचे फोन आणि मौल्यवान वस्तू चोरून त्यांना मारहाण करायचे. महामार्गावरील पोलिसांनी 12 तासांच्या आता 12 चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भंडारा पोलिसांनी ही बेधडक कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर 12 जणांची टोळी भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर खिळ्यांची लोखंडी पट्टी महामार्गावर टाकायचे. आणि भरधाव ट्रकसह अन्य वाहनांना सिनेस्टाईल थांबून वाहनातील चालक आणि क्लिनरला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील रोकड हिसकवायचे. राष्ट्रीय महामार्गावर या टोळीने गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगलाच उच्छाद मांडला आहे. दररोज राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी या चोरट्यांची गँग ट्रकसह वेगवेगळ्या वाहनांवर डल्ला मारायचे. आता त्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
advertisement
गेल्या तीन ते चार दिवसांपासून 12 जणांच्या या चोरट्यांच्या टोळीने मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर चांगलाच उच्छाद मांडला आहे. 17 डिसेंबरच्या (बुधवारी) मध्यरात्री या टोळीनं एकापाठोपाठ चार ट्रकला लुटलं होतं. त्यात रायपूर इथून कर्नाटकाकडे तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला थांबवून त्याच्या काचा फोडून, चालकाला मारहाण करीत 15 हजारांची रोकड लुटली. ड्रायव्हरने पोलिसांकडे तक्रार करत पोलिसांनी त्यांची चौकशीची चक्रे फिरवत सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. ट्रक चालकाने दिलेल्या तक्रारीमुळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिस घटनेची सविस्तर चौकशी करत आहे.
advertisement
रस्त्यांवरील वाहनांवर दरोडा घालणाऱ्या 12 जणांच्या टोळीत खून आणि लुटमार करणारे अट्टल गुन्हेगार, एक शासकीय कर्मचारी, एक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चौघ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी भंडारा, गणेशपूर आणि नागपूर जिल्ह्यातील आहेत. घटनेसाठी आरोपींनी वापरलेली झायलो कार, तीन दुचाकी, आरोपींचे मोबाईल, लाठ्याकाठ्या, खिळ्यांची लोखंडी पट्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गँगमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? या दृष्टीनं भंडारा पोलिस अधिक तपास करत आहेत. एखाद्या प्रकरणात 12 जणांच्या गँगला एकाचवेळी अटक केल्याची भंडारा पोलिसांची ही पहिलीचं मोठी कारवाई आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रात्री सावज, दिवसा नोकरी! राष्ट्रीय महामार्गावर ‘सिनेस्टाईल’ दरोडा टाकणारे 12 जण पोलिसांच्या ताब्यात











