Ganesh Chaturthi 2025: पैठणी फेटा ते पेशवाई पगडी, बाप्पा दिसेल एकदम रुबाबदार, इथं 10 रुपयांत मिळतो फेटा
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सजावटीत फेट्याला फार महत्त्व आहे. फेट्याशिवाय बाप्पाची मूर्ती अपूर्ण वाटते. आकर्षक फेटा असला की, मूर्ती एकदम रुबाबदार दिसते.
पुणे: सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठाही सजावटीच्या साहित्याने फुलून गेल्या आहेत. अनेकजण गणपती बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याच्या खरेदीत व्यस्त दिसत आहेत. बाप्पाच्या सजावटीच्या साहित्यात केंद्रस्थानी असतो तो म्हणजे बाप्पाचा फेटा. पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी येथे असलेल्या 'राज फेटे' या दुकानात एकदम स्वस्त दरात बाप्पाचे फेटे उपलब्ध आहेत. बाप्पाला शोभून दिसतील अशा विविध डिझाईन्सचे फेटे येथे मिळत आहेत.
10 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत फेटे उपलब्ध
गणपती बाप्पाच्या 1 इंच ते 10 फूट उंचीच्या मूर्तींसाठी येथे फेटे उपलब्ध आहेत. फेट्यांची किंमत फक्त 10 रुपयांपासून सुरू होते. काही फेट्यांच्या किंमती 30, 50, 100 आणि 1500 रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार खास डिझाईनचे फेटे येथे तयार करून दिले जातात.
advertisement
फेट्यांचे असंख्य प्रकार एकाच ठिकाणी
view commentsया दुकानात गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे फेटे उपलब्ध आहेत. पैठणी साडीच्या धाग्यांपासून बनवलेले पैठणी फेटे पारंपरिक आणि आकर्षक दिसतात. नऊवारी फेटा नऊवारी साडीच्या बांधणीसारखा असून मूर्तीला पारंपरिक लुक देतो. तसेच फुलांचे फेटे फुलांच्या डिझाईनवर आधारित असून सजावटीत वेगळेपणा आणतात. पुणेरी पगडी आणि पेशवाई पगडी या राजेशाही आणि पारंपरिक स्पर्श देणाऱ्या प्रकारचे फेटे देखील येथे आहेत. याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या मूर्तींसाठी रेडीमेड फेटे उपलब्ध आहेत. गणेशोत्सवाच्या सजावटीत बाप्पाच्या फेट्यांना वेगळं स्थान आहे. त्यामुळे या वर्षी तुमच्या बाप्पालाही आकर्षक फेट्याने सजवायचं असल्यास हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकतं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 24, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: पैठणी फेटा ते पेशवाई पगडी, बाप्पा दिसेल एकदम रुबाबदार, इथं 10 रुपयांत मिळतो फेटा

