Uddhav Thackeray : राजसोबतची टाळी कामी येईना! पक्षातलं आऊटगोईंग सुरूच, उद्धव ठाकरे थेट मैदानात, प्लॅन काय?
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Uddhav Thackeray : राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असूनही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरू आहे. आता पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत.
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काही महिन्यांचा अवधी उरला आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपली ताकद मुंबईतही असून ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे दाखवण्याचे प्रयत्न आता शिंदे गटाकडून सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असूनही ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरू आहे. आता पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही रणनिती आखली जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका या गणेशोत्सवानंतर होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे गटातील आऊटगोईंग आणि शिंदे गटातील इनकमिंग थांबल होतं. आता शिंदे गटातील इनकमिंग पुन्हा सुरू झालं आहे.
advertisement
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीनंतर मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधीच ठाकरे गटामध्ये गळतीचा ओघ कायम आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला असतानाही ठाकरे गटातील माजी नगरसेवक टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
उद्धव ठाकरे उतरणार थेट मैदानात...
पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सक्रिय भूमिका स्वीकारली आहे. नुकतेच सायन प्रतीक्षा नगर येथील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीनंतर ठाकरे यांनी स्थानिक शाखेत थेट फोन करून शिवसैनिकांशी संवाद साधला आणि मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वॉर्डांतील माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे, त्या भागातील उर्वरित शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे आता थेट संवाद साधणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागात बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे थेट संवाद साधून संघटना बळकट करण्यासोबत स्थानिक शिवसैनिकांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील बहुसंख्य शिवसैनिक हा मातोश्रीसोबत राहिला होता. त्यामुळे आता याच शिवसैनिकांच्या मदतीने उद्धव ठाकरे आता मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामाची तयारी करत आहेत.
advertisement
शिंदे गटाकडे आतापर्यंत किती माजी नगरसेवक?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईवरही आपले लक्ष केंद्रीत केले. मुंबईतील काही आमदारांनी शिंदे यांना बंडात साथ दिली. त्यानंतर शिंदे यांनी आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळवला आहे. एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटाचे 45 नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत. हे नगरसेवक मागील टर्मचे आहेत. तर, दुसरीकडे आतापर्यंत भाजप वगळता इतर पक्षातील 125 माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : राजसोबतची टाळी कामी येईना! पक्षातलं आऊटगोईंग सुरूच, उद्धव ठाकरे थेट मैदानात, प्लॅन काय?