Raj Thackeray Dasara Melava : ठाकरेंचे मावळे राज भेटीसाठी 'शिवतीर्था'वर, शर्मिला वहिनींच्या कृतीने भारावले शिवसैनिक

Last Updated:

Raj Thackeray Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्था'वर शिवसैनिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.

ठाकरेंचे मावळे राज भेटीसाठी 'शिवतीर्था'वर, शर्मिला वहिनींच्या कृतीने भारावले शिवसैनिक
ठाकरेंचे मावळे राज भेटीसाठी 'शिवतीर्था'वर, शर्मिला वहिनींच्या कृतीने भारावले शिवसैनिक
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचा आज दसरा मेळावा पार पडत असून दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शिवसैनिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्था'वर शिवसैनिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कृतीने शिवसैनिक भारावून गेले. तर, दुसरीकडे ठाकरे बंधू यांच्या युतीच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत एक वेगळीच राजकीय रंगत अनुभवायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचे स्वागत करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली.
शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपट्याची सोनं देत शुभेच्छा दिल्या. त्यांनी दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाला मिठाई वाटून सणाचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्याने शिवतीर्थावर आलेल्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.  यावेळी आम्हाला अशा स्वागताची अपेक्षा नव्हती, तुम्हाला भेटून आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. तर, शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली.
advertisement
दरम्यान, दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकारणातील परंपरा मानला जातो. मात्र, यंदा शिवसेनेच्या दोन्ही गटांचे (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) वेगळे मेळावे पार पडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी झालेली ही घडामोड विशेष लक्षवेधी ठरली आहे. राज्यातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सरकारविरोधात भूमिका घेताना आगामी निवडणुकीबाबत कोणतं भाष्य करणार आहेत, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Dasara Melava : ठाकरेंचे मावळे राज भेटीसाठी 'शिवतीर्था'वर, शर्मिला वहिनींच्या कृतीने भारावले शिवसैनिक
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement