Public Safety Bill: ही तर 'भाजप सुरक्षा', उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकाला केला विरोध, 'त्या' मुद्यावर केला संशय व्यक्त
- Published by:sachin Salve
Last Updated:
महाविकास आघाडीने कायद्याला विरोध केला आहे. या विधेयकाला असहमती देणारे पत्र महाविकास आघाडीने सभापती यांना सादर केलं आहे.
मुंबई: महायुती सरकारने बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केलं आणि मंजूर केलं आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सादर केलं होतं. पण आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीने कायद्याला विरोध केला आहे. या विधेयकाला असहमती देणारे पत्र महाविकास आघाडीने सभापती यांना सादर केलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला आमचा विरोध आहे, यामध्ये दुरस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
विधिमंडळात पत्रकारांशी बोलत असताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. काल गुरुवारी आणि आज विधिमंडळात जनसुरक्षा कायदा आणला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे त्याचा दुरूपयोग करत आहे. सरकारने करत आणि करणी यात फरक आहे. आता कडवी डाव्या विचारसरणीचे असा शब्दप्रयोग पहिल्यांदा ऐकत आहे. डावे आणि उजवे असे आता होत आहे. डावे आणि उजवे करण्याची गरज काय आहे. संविधानामध्ये सर्व समावेशकत आहे असं म्हटलं आहे. डावी आणि उजवी असे काही नाही. दहशतवादाचा विरोध असेल तर आम्ही सरकार सोबत राहू. पण यात कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही त्यामुळे यातून राजकीय वास येत आहे. या बिलात दहशतवाद, नक्षलवाद असा शब्द नाही. याआधी कायदे होते, या बिलात काही ही नाही, अशी टीका ठाकरेंनी केली.
advertisement
' या आधी टाडाचा दुरूपयोग केला गेला आहे, आमच्याकडे ये नाही तर तुरुंगात टाकेल. हे विधेयक योगेश कदम यांनी मांडले. मग प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी बोलले. त्यामुळे या बिलाचा राजकीय दुरूपयोग केला जाईल, असा संशय ठाकरेंनी व्यक्त केला.
'जनसुरक्षा कायद्यात सुधारणा करा असं आम्ही सांगितलं. भाजप सुरक्षा कायदा आहे जो भाजप विरोधात बोलेल तर आत घाला. ६४ च्या ६४ संघटनाची नावं जाहीर करावी त्यासोबत त्यांनी केलेलं पाप समोर आणावं, अशी मागणीही ठाकरेंनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Public Safety Bill: ही तर 'भाजप सुरक्षा', उद्धव ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकाला केला विरोध, 'त्या' मुद्यावर केला संशय व्यक्त