Uddhav Thackeray : 'ठाकरे ब्रँड'ची अजून सुरुवात नाही झाली,सुरुवात झाल्यावर बघा...', उद्धव ठाकरेंचा इशारा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
'ठाकरे ब्रँड'ची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होत,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray News : सुमित सावंत, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवनात बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला आहे.या मेळाव्यात 'ठाकरे ब्रँड'ची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होत,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
बेस्ट निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पॅनेलचा पराभव झाला होता.या पराभवावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,पराभव झाला पण दाखवल काय गेलं 'ठाकरे ब्रँड', 'ठाकरे ब्रँड' अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होत,असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.ठाकरे ब्रँड म्हणजे काय आपल्या राज्यातील मराठी हिंदूसाठी आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला लढायची काय खाज आहे,असेही त्यांनी सांगितले. त्यासोबत बेस्टच्या पॅनलमध्ये आम्हाला का मतदान दिल नाही? हे एकमेकांमध्ये बोला, एकमेकांना विचारा असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आत्ममंथन करण्यास उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. काल परवा झालेला पराभव याची कारण काहीही असतील, पराभवातून खचणारा मी नाही, त्यातून विजयी मिळवणारा मी आहे,असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
advertisement
तुमची काम करण्याची जिद्द आणि निष्ठा महत्वाची आहे.शिवसेनेने यापुर्वी कमी वादळं आणि कमी संकट पाहिली नाहीत असं नाही.शिवसेनेने पाहिलेल्या वादळांना आणि संकटांना शिवसैनिक म्हणून तुम्ही उत्तर दिले आहे. बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची चिंता नाही पण बेस्टच काय होईल याची काळजी आहे. गद्दारी झाली त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे सर्वाना कळलं आहे. कागदावर सत्ता कोणाची असली तरी वट कोणाची आहे हे सर्वाना तुम्ही दाखवलं आहे,असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
advertisement
मी स्वतः बेस्टने प्रवास करणारा आहे शाळेत असताना कॉलेजला जाताना प्रवास केला आहे, तुंबलेल्या पाण्यातून बेस्ट कशी काढली हे मी पाहिली आहे. मी मुख्यमंत्री असताना दोन तीन डेपोच नूतनिकरण केल होतं.कर्मचारी माणसं आहेत.त्यांना त्याचा अधिकार मिळाली पाहिजे म्हणून आपली कामगार सेना आहे. आता चांगल काम केल पगार दिला बोनस देण्याची परिस्थिती आहे कि नाही माहिती नाही, सरकार यांचं आहे पण लोकांना द्यायला पैसा नाही. न्याय हक्काचा माणूस हा बेस्ट कामगार सेनेचा आहे म्हणून मला बेस्ट कामगार सेना महत्वाचा आहे. तीन नवे दिलेत म्हणजे जुने काढले नाहीत.काही ठिकाणी बदल करावे लागतात.बदल केले म्हणजे संघटना वाढणारच. मला ताकदीने फडकणारा भगवा हवाय, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 11:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'ठाकरे ब्रँड'ची अजून सुरुवात नाही झाली,सुरुवात झाल्यावर बघा...', उद्धव ठाकरेंचा इशारा