राजेंद्र हगवणेला लपवण्यासाठी मंत्र्याने लावली फिल्डिंग? धक्कादायक कनेक्शन आलं समोर

Last Updated:

Crime in Pune: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाचे बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याच्यासह त्याच्या कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे.

News18
News18
पुणे: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाचे बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याच्यासह त्याच्या कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे सात दिवस फरार होते. आठव्या दिवशी दोघांना पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आरोपींभोवतीचा कारवाईचा फास घट्ट होत असून पुरावे जमा करण्यात येत आहे. आता, या प्रकरणात आता एका माजी मंत्र्याचं कनेक्शन समोर आलं आहे. संबंधित मंत्र्यानेच राजेंद्र हगवणेला लपण्यासाठी मदत केली का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
खरं तर, गुन्हा घडल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे 7 दिवस फरार होते. त्यांनी पुण्यासह सातारा जिल्ह्यात आणि कर्नाटकच्या सीमेपर्यंत प्रवास केला होता. या प्रवासांत त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला होता. तसेच त्यांनी आपली लपवण्याची ठिकाणं देखील सातत्याने लपवली होती. दोघांना अटक केल्यानंतर आता ते कुठे होते, कोणाच्या मदतीने पळाले, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement

राजेंद्र हगवणेला माजी मंत्र्याची मदत?

एका वृत्तसंकेतस्थळाला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हगवणे 19 ते 21 मे दरम्यान कोल्हापूरजवळील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ‘हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये थांबले होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी त्यांची व्यवस्था कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. तसेच राजेंद्र हगवणेला लपवण्यासाठी स्वत: माजी मंत्री महोदयांनी तर मदत केली नाही ना? असा सवालही उपस्थित केला जातोय.
advertisement

राजेंद्र हगवणे कुठे कुठे लपला?

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे इंडीवर कारने दाखल झाले होते. त्यावेळी अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून थार गाडीने पळ काढला. त्यानंतर त्यांनी मुहूर्त लॉन्स, पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला. १८ मे रोजी थार गाडीनेच त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला.
advertisement
१९ मे रोजी आरोपींनी पुन्हा गाडी बदलली आणि बोलेरो गाडीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पलायन केले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. २० मे रोजी पुसेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये थांबले. २१ मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला आणि २२ मे रोजी ते पुन्हा पुण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटक झाली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजेंद्र हगवणेला लपवण्यासाठी मंत्र्याने लावली फिल्डिंग? धक्कादायक कनेक्शन आलं समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement