भाजप बॅकफूटवर, विश्वजित कदम 'किंगमेकर'च्या भूमिकेत, पलूस-कडेगावात राजकीय समीकरणं बदलणार!

Last Updated:

Sangli Pilitics : सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. भाजपमधील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि...

Sangli Pilitics
Sangli Pilitics
Sangli Pilitics : पलूस-कडेगाव तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम दोन्ही तालुक्यांमध्ये 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहेत. त्यांनी आपल्या संघटित कुटुंबाच्या ताकदीवर तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढवली आहे.
भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष
एकीकडे काँग्रेसची ताकद वाढत असताना, भाजप मात्र या तालुक्यात बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोन बंधूंमध्ये निर्माण झालेली दरी हे यामागचे मुख्य कारण मानले जाते. परंतु दोघा बंधुंनी आता भाजपच्या संघटनवाढीसाठी सरसावले आहेत.
अन्य पक्षांची तयारी
काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) युवा नेते शरद लाड यांनी तिसरा पर्याय तयार केला आहे. त्याचप्रमाणे, स्वाभिमानी आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) देखील आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याने काँग्रेसला याचा फायदा होण्याची आशा आहे.
advertisement
राजकीय समीकरणे बदलणार
या परिस्थितीत, शरद लाड यांनी पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्वाभिमानी आघाडीचे युवा नेते निलेश येसुगडे यांनी पलूस शहरावर लक्ष केंद्रित केले असून, मागील नगरपालिका निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले होते. राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेले प्रदीप कदम देखील या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत. शिवसेनेचे (उद्धव गट) विनायक गोंदील आपला वेगळा गट तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकंदरीत, पलूस-कडेगाव तालुक्यात आगामी निवडणुकांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदललेली दिसतील अशी चिन्हे आहेत.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप बॅकफूटवर, विश्वजित कदम 'किंगमेकर'च्या भूमिकेत, पलूस-कडेगावात राजकीय समीकरणं बदलणार!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement