KDMC हद्दीमध्ये प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन, मनसे जिल्हाध्यक्षांचे निवडणूक आयोगाला पत्र
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
केडीएमसीचे माजी विरोधी पक्ष नेते आणि मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना लेखी पत्र देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना हरकती घेतल्या आहेत.
डोंबिवली : केडीएमसीचे माजी विरोधी पक्ष नेते आणि मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना लेखी पत्र देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना हरकती घेतल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन करुन झाल्या आहेत, असे भोईर यांनी सांगितले आणि याबाबत ते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्ताची भेट घेणार असून मुख्यमंत्री यांना सुद्धा निवेदन देणार आहे.
याबाबत प्रकाश भोईर यांनी सांगितले की प्रभाग रचनेच्या एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४ या आदेशानुसार प्रभाग रचनेची सुरुवात ही उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिनेकडून येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे होणे अपेक्षित होते. परंतू संपूर्ण प्रभाग रचना ही आदेशाचे उल्लंघन करुन बनविली असल्याचे दिसत आहे. सध्याची प्रभाग रचना ही उंबार्डे सापार्डेगाव खडकपाडा या ठिकाणावरुन केली आहे जी टिटवाळा/मांडा टिटवाळा या उत्तरभागातील विभागातून होणे अपेक्षित होते.
advertisement
तसेच शासन निर्णयानुसार ५.३ परिशिष्ठनुसार नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येते. प्रभाग क्रमांक २१, २२, २३, २४ आणि २५ डोंबिवली पश्चिमेत या प्रभागांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.या प्रभागातील प्र.क्र. २१ व २५ हे प्रभाग ३ सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे, जी नियमांना धरुन नाही आहे. यामध्ये कोणतीही भौगोलिक आपत्ती दिसत नाही. प्रस्तावित बदल: प्रभाग क्र. २१, २२, २३, २४ आणि २५ मधील २४ व २५ तीन सदस्यीय प्रभाग रचना असावी जी आपल्या नियमांना धरुन आहे. शासकीय आदेशाचे पालन करणारे आहे, असे भोईर म्हणाले..
advertisement

तसेचं भोईर यांनी सांगितले की २४ जून २०२० मध्ये २७ गावांमधील १८ गावे वगळण्याचा शासन निर्णय झाला होता.त्यानंतर १८ गावातील १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद हे रद्द करण्यात आले होती.यानंतर १८ गावांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा कोणताही शासन निर्णय झाला नसताना त्या १८ गावांसहीत प्रभाग रचना करण्यात आली जी नियमांची उल्लंघन करणारी आहे.(शासन निर्णय क्रमांक कडोंमपा-१०१५/प्र.क्र.१५(३)/नवि-२८, दि. २४/०६/२०२०)
advertisement
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागाचे स्पष्ट निर्देश असताना (महाराष्ट्र महानगरपालिकाअधिनियम १९४९ चे कलम ५(३) व नगर विकास विभागाचा आदेश क्रमांक MCO- 2025/प्र.क्र.२४२/नवि-१४) दिनांक १० जून २०२५ नुसार प्रभाग रचना तयार करण्यात याव्यात.परंतु या निर्देशांचे आणि नियमांचे उल्लंघन करुन महानगरपालिकेने अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्या आहेत. ज्यावर आम्ही पक्षाच्यावतीने हरकती देखील नोंदविल्या आहेत. परंतु प्रशासन हरकती नोंदविण्याचे व त्यावर सुनावणी घेण्याची औपचारिक प्रक्रिया पार पाडीत असल्याचे प्रथम दर्शन निदर्शनास येते, असे भोईर यांचे म्हणणे आहे.. आता भोईर यांनी घेतलेल्या हरकतीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त काय निर्णय घेतात हे पहावे लागेल..
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC हद्दीमध्ये प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन, मनसे जिल्हाध्यक्षांचे निवडणूक आयोगाला पत्र