गुरं घेऊन शेतात गेला पण घरी परतलाच नाही; वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, वर्ध्यातील दुर्दैवी घटना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शेतात बैल चारत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
वर्धा, 5 सप्टेंबर, नरेंद्र मते : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शेतात बैल चारत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ वनपरिक्षेत्रात घडली आहे. गोविंदा लहानु चौधरी असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव येथील रहिवासी होते.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोविंदा चौधरी हे आज सकाळी समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ वनपरिक्षेत्रात बैलांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. याचदरम्यान या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. वाघानं त्यांना दोनशे मिटर फरफटत नेलं. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं हळहळ व्यक्त होतं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
advertisement
शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
परिसरात वाघाकडून होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. आज पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून, वनविभागानं लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
गुरं घेऊन शेतात गेला पण घरी परतलाच नाही; वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, वर्ध्यातील दुर्दैवी घटना








