गोमुखातून अखंड वाहते पंचधारा, कमळजापूरच्या भवानी मातेबाबत आहे अनोखी मान्यता
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रातील भवानी मातेच्या प्रसिद्ध मंदिरातील गोमुखातून अखंड पंचधारा वाहते. पाहा कुठं आहे हे मंदिर..
यवतमाळ, 22 ऑक्टोबर: सध्या देशभर मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. देशात आणि राज्यात देवीची अनेक प्राचीन मंदिरे असून या मंदिरात भाविक गर्दी करतात. असंच एक प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात आहे. राणी अमरावती पासून 3-4 किलोमिटर अंतरावर कमळजापूर येथे भवानी मातेचे पुरातन हेमांडपंती मंदिर आहे. या मंदिराला ऐतिहासिक वारसा असून धार्मिक महत्त्वही आहे. याबाबत यवतमाळ येथील ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापूर यांनी माहिती दिलीय.
कमळजापूर मंदिराला लागूनच वळसा घेत उत्तरमुखी वाहणारी नदी, हिरव्यागार वृक्षवेली व लागूनच असलेले शेत शिवार या मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. या ठिकाणच्या शांत परिसरात मन प्रसन्न होते. कमळजादेवीचं प्रसिद्ध पुरातन मंदिर आहे. मूर्तीचा आणि या ठिकाणचा इतिहास फार प्राचीन आहे. मात्र वर्ष 2002 मध्ये नवरात्रीच्या दरम्यान लोकांना त्या ठिकाणी मूर्तीच्या रूपात देवी आढळल्याचे सांगितले जाते.
advertisement
2002 मध्ये गावकऱ्यांना सापडली मूर्ती
देवीची मूर्ती आणि या ठिकाणचा इतिहास फार प्राचीन आहे. वर्ष 2002 मध्ये नवरात्रीच्या दरम्यान लोकांना त्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडल्याचं सांगितलं जातं. ज्या ठिकाणी मूर्ती सापडली तो भाग एका डोंगरासारखा होता. डोंगरावर काही मुलं सायंकाळच्या वेळेला फिरायला जात. त्या मुलांना उत्सुकता लागली आणि त्यांनी त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या ठिकाणी मूर्ती आढळल्याचं सांगितलं जातं.
advertisement
हेमाद्रीपंतांनी बांधली मंदिरे
राजा रामदेवराय या राजाच्या काळामध्ये राज्यावर शत्रूंचं आक्रमण झालं. त्या काळामध्ये राजा रामदेवरायचा वध झाला. राजाचा मंत्री हेमाद्रिपंत होते. मंदिराचे बांधकाम राजवाड्याचे बांधकाम याकडे ते बारकाईने लक्ष द्यायचे. त्यांनी औरंगाबाद पासून साधारणपणे विदर्भाच्या शेवटच्या टोकापर्यंत शिवमंदिर आणि देवीची मंदिरे बांधली. केवळ एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 44 मंदिरो असल्याचं जेष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे सांगतात. ही मंदिरे काही पडक्या तर काही उद्ध्वस्त स्वरूपातही आहेत. परंतु सामान्यतः चंद्रपूर पर्यंत ही मंदिर आहेत, असंही ते सांगतात.
advertisement
मंदिर भाविकांचे तीर्थक्षेत्र
हेमाद्रीपंत हे शिवभक्त असल्यामुळे मूर्ती तर सापडली. परंतु त्याचा पूर्णपणे काही शोध घेण्यात आला नाही. या ठिकाणी एक गोमुख आहे ज्या ठिकाणाहून एक झराही वाहतो. त्याला लोक तीर्थक्षेत्र असं संबोधतात. कमळजादेवीचं हे तीर्थक्षेत्र असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी सापडलेली मंदिरे अतिशय प्राचीन असून त्याचे संशोधन होणे गरजेचे असल्याचेही ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापुरे यांनी सांगितले.
advertisement
गोमुखातून अखंड वाहणारी पंचधारा
मंदिराला लागूनच वेरुळा नदीकाठी अखंड वाहणारे पंच धारा गोमुख आहे. गोमुखाचे पाणी गंगेच्या पाण्या एवढेच पवित्र असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. या पंचधारा गोमुखाची धार कड्क उन्हातही तेवढीच थंडगार असते. या गोमुखातून निघणाऱ्या पाण्याची चव गोड आहे. नवरात्रीत इथं यात्रा आयोजित केली जाते. हे ठिकाण यवतमाळ वासियांसह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Yavatmal,Maharashtra
First Published :
Oct 22, 2023 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
गोमुखातून अखंड वाहते पंचधारा, कमळजापूरच्या भवानी मातेबाबत आहे अनोखी मान्यता





