ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या करुणा फुटाणे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन!

Last Updated:

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या व ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

News18
News18
वर्धा, 3 ऑगस्ट, नरेंद्र मते :  ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या व ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामसेवा मंडळाच्या परिसरातील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. वर्ध्यातील हिंदू स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ कृषीज्ज्ञ व सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव फुटाणे, मुले विनय व चिन्मय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
गांधीवादी कार्यकर्त्या अशी करुणा फुटाणे यांची ओळख आहे.  विनोबा भावे यांची चळवळ त्यांनी पुढे नेली. हयातभर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येसाठी लढत राहिल्या. त्या सेंद्रिय शेतीच्या पुरस्कर्त्या होत्या. आज वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामसेवा मंडळाच्या परिसरातील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महात्मा गांधी यांच्या विचाराचा समृद्ध वारसा गमावल्याची भावना आहे.
advertisement
कृषी उद्योजकता, गोशाळा, तेलबियांचे सेंद्रिय बीजोत्पादन, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरण यामध्ये त्याचं मोलाचं योगदान आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या करुणा फुटाणे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement