तणसाच्या गजराजांची निघते मिरवणूक, विदर्भातील गावात आहे अनोखी परंपरा, Video
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
विदर्भातील विरूळ आकाजी गावातील आबाजी महाराजांची यात्रा प्रसिद्ध आहे.
वर्धा, 6 डिसेंबर: महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा गाव खेड्यांमध्ये भरतात. प्रत्येक यात्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातील विरूळ आकाजी या गावातील आबाजी महाराजांची यात्रा वर्धा जिल्हा वासियांसाठी उत्साहाची बाब असते. या तणसापासून गजराजाची प्रतिकृती साकार केली जाते. तसेच या गजराजाची गावात मोठ्या थाटात मिरवणूक काढली जाते. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली असून गावातील अनेक नागरिक एकत्र येऊन या यात्रा महोत्सवाची परंपरा कायम ठेवत आहेत.
असा तयार होतो गजराज
एका गावावरून मोठ्या प्रमाणात तणस विकत आणलं जातं. या तणसाला बैलबंडीवर विशिष्ट पद्धतीने मांडून त्याला गजराजाचा म्हणजेच मोठ्या हत्तीचा आकार दिला जातो. हे काम मोठ्या कलाकारीचं आहे. या कामामध्ये गावातीलच अंड्रस्कर परिवारासह मित्रमंडळी एकत्र येऊन गजराज उभारतात. तणसाला विशिष्ट पद्धतीने बांधून त्यावर पोत्याच्या सहाय्याने आकर्षक रित्या तयार करून वेगवेगळ्या वस्तूंच्या साह्याने सजवलं जातं आणि हा भला मोठा हत्ती म्हणजेच गजराज मिरवणुकीसाठी तयार केला जातो.
advertisement
अंड्रस्कर परिवार जोपासतोय वारसा
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विरूळ यात्रा महोत्सवामध्ये तणसापासून हत्ती म्हणजेच गजराज बनविण्याची परंपरा आजही कायम आहे. हा गजराज तयार करण्यासाठी अंदाजे आठवडाभरापूर्वी गावकरी तयारीला लागतात. अंड्रस्कर परिवार अनेक वर्षांपासून हा गजराज तयार करत असून सध्या रमेश अंड्रस्कर हा गजराज तयार करतात. हा गजराज आता आकर्षक रित्या बनवून तयार आहे.
advertisement
नागरिकांची जमते गर्दी
view commentsविरुळातील आबाजी महाराजांचा यात्रा महोत्सव हा वर्धेकरांसाठी उत्साहाचं स्थान असतं. यावर्षी 6 डिसेंबर पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होत असून जिल्हाभरातून भाविकांची गर्दी या ठिकाणी जमते. भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने हा सोहळा बघण्यासाठी येत असतात. मिरवणुकीमध्ये आबाजी महाराज यांची पालखी तणासापासून तयार केलेला गजराज तसेच विदर्भस्तरीय वारकरी दिंडी स्पर्धा हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असतं.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
December 06, 2023 10:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
तणसाच्या गजराजांची निघते मिरवणूक, विदर्भातील गावात आहे अनोखी परंपरा, Video

              