KDMC Water Supply: ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीत उद्भवणार पाणीबाणी, 7 तास पाणीपुरवठा बंद, काय म्हणाली महापालिका?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
KDMC Water Supply: मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करता येणार नाही.
कल्याण: येत्या मंगळवारी (9 सप्टेंबर) कल्याण-डोंबिलवलीकरांना पाण्याच्या तात्पुरत्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांना विद्युत पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील NRC - 2 फीडरच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला विद्युत पुरवठा होणार नाही. परिणामी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत परिपत्रक काढला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 150 दस लक्ष लीटर क्षमतेच्या नेतिवली जलविद्युत केंद्र व 100 दस लक्ष लीटर क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राला टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो. मंगळवारी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करता येणार नाही. याशिवाय, बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखील दुरूस्ती केली जाणार आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामीण विभागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व इतर गावे आणि डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसराला केला जाणार पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकला सहकार्य करावं, अशी विनंती करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 05, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Water Supply: ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीत उद्भवणार पाणीबाणी, 7 तास पाणीपुरवठा बंद, काय म्हणाली महापालिका?


