'हैदराबाद गॅझेट' देणार मराठ्यांना आरक्षण? राणे समितीने आरक्षण कसं दिलं होतं?

Last Updated:

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून अभ्यास न करता अंमलबजावणी करणे लगेच कसे शक्य आहे, अशी विचारणा विखे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
मुंबई : हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करावे, त्यातून काही ओबीसींच्या आरक्षणणावर अतिक्रमण होत नाही, असे मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. परंतु, १९३१ च्या गॅझेटचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करताना त्यावरील न्यायालयाच्या निकालपत्रातील निर्देश तपासावे लागतील. यातून मार्ग निघू शकतो का याची चाचपणी आम्ही करत आहोत, असे मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून अभ्यास न करता अंमलबजावणी करणे लगेच कसे शक्य आहे, अशी विचारणा विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे 'हैदराबाद गॅझेट'मध्ये नेमके काय आहे, याच्याबद्दल लोकांना कुतूहल निर्माण झाले आहे.

'हैदराबाद गॅझेट' नेमकं काय? देणार मराठ्यांना आरक्षण?

हैदराबाद गॅझेट म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या काळातील सरकारी राजपत्र
advertisement
गॅझेटमध्ये मराठा समाजाची 'कुणबी मराठा' अशी नोंद
हैदराबाद संस्थानातील 1881 च्या जनगणनेत 'कुणबी मराठा' नोंद
शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा, असा गॅझेटमध्ये उल्लेख
हैदराबाद सरकारचा 1902 ते 1948 दरम्यान समाजघटकांबाबत अभ्यास
अभ्यास करून काही जातींना शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागास घोषित केले
गॅझेटमध्ये मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मागास गटात दाखवले
advertisement
घोषणांची नोंद अधिकृत अशा हैदराबाद गॅझेट्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती

मराठा समाजाला कसं मिळालं होतं आरक्षण?

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली 21 मार्च 2013 रोजी समिती
राणे समितीनं राज्यात फिरून, तज्ज्ञांशी बोलून अहवाल सादर केला
मराठा आणि कुणबी समाज एकच
कुणबी समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस
नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची शिफारस
advertisement
न्या. गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर केला
अहवालातील नोंदी कोर्टात महत्त्वाच्या मानल्या गेल्या
3 शिफारशी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूर
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हैदराबाद गॅझेट' देणार मराठ्यांना आरक्षण? राणे समितीने आरक्षण कसं दिलं होतं?
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement