Maharashtra New CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिवसेना-राष्ट्रवादीला कुठली खाती, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली आहे.
भाजपला काय, शिवसेनेला काय मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला मुख्यमंत्रिपद आणि गृहखातं मिळणार आहे, तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळेल. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रातही एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये भाजप महाराष्ट्रातला त्यांचा गटनेता निवडणार आहे. यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत.
advertisement
भाजपने गटनेता निवडल्यानंतर 1 डिसेंबरला महायुतीची बैठक मुंबईमध्ये पार पडेल, यानंतर 2 डिसेंबरला शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकट्या भाजपला 132 तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
November 29, 2024 12:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra New CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिवसेना-राष्ट्रवादीला कुठली खाती, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?


