चाणक्य विरुद्ध चाणक्य! शरद पवारांना संधीच देणार नाही, अमित शहा असं का म्हणाले?

Last Updated:

Amit Shah :a विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवं समीकरण दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

News18
News18
 मुंबई : गेल्या पाच वर्षात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन पक्षांचे चार पक्ष झाले. राज्यात सत्ता बदलली. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेची चर्चा सातत्याने होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवं समीकरण दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
महायुतीने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल प्रश्न विचारला असता अमित शहांनी म्हटलं की, निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून हा निर्णय घेणार आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. तसंच शरद पवार यांना संधी देणार नाही असंही अमित शहांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांना नेमकी कशाची संधी देणार नाही हे मात्र अमित शहा स्पष्ट बोलले नाहीत. भाजप महायुतीला पाठिंबा देण्याची की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची संधी हा प्रश्न अनुत्तरित आहे.
advertisement
शरद पवारांच्या पाठिंब्याबाबत अजितदादा काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांनी यावर भाष्य करताना म्हटले की, शरद पवारांच्या मनात काय आहे त्याचा थांगपत्ता कुणालाच लागू शकत नाही.
advertisement
शरद पवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम
२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं होतं. तर त्याआधी २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. तेव्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण बहुमत गाठता आलं नव्हतं. त्यावेळी शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळेच आता पुन्हा एकदा त्यांच्या पाठिंब्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाणक्य विरुद्ध चाणक्य! शरद पवारांना संधीच देणार नाही, अमित शहा असं का म्हणाले?
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement