आता मातीशिवाय पिकवा चारा, शेतकऱ्यांच्या फायद्याचं हायड्रोपोनिक तंत्रज्ञान नेमकं काय? Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जनावरांसाठी फक्त 10 दिवसांच्या आत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चारा बनवता येतो. विशेष म्हणजे मातीशिवाय फक्त पाण्याचा वापर करून हा चारा बनवता येतो.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : भारतातील बहुतांश शेतकऱ्यांचा पशुपालन हा प्रमुख जोडधंदा आहे. पाणीटंचाई आणि इतर कारणांनी शेतकऱ्यांना बऱ्याचदा चाऱ्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. परंतु, आता फक्त 10 दिवसांत शेतकऱ्यांना दर्जेदार चारा बनवता येईल. विशेष म्हणजे मातीशिवाय फक्त पाण्याचा वापर करून हा चारा बनवता येतो. हे तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती होय. ही चारा निर्मिती कशी केली जाते? यबाबत पुण्यातील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
कसा बनवला जातो चारा?
हायड्रोपोनिक चारा हा अत्यंत पौष्टिक असतो. त्यात सर्वाधिक प्रोटिन्स असतात. मका, गहू, ज्वारी, बाजरी यांपासून हा चारा बनवला जातो. 1 किलो धान्यापासून 5 ते 6 किलो चारा उत्पादन होते. विशेष म्हणजे हा चारा मातीशिवाय बनतो. तसेच वेळ आणि खर्चाची बचत होते. सर्व प्रथम एक दिवस मका पाण्यात भिजवून त्यात 100 मिली गोमूत्र टाकून दोन दिवस पोत्यात गुंडाळून ठेवला जातो. त्यानंतर फॉगर लावून 6 दिवस प्लास्टिक ट्रे मध्ये ठेवलं जात. 9 दिवसात त्याची लादी तयार होते. एका गाईचं युनिट करण्यासाठी साधारण 15 हजार रुपये खर्च येतो. तर 20 वर्षांपर्यंत हे युनिट चालतं, असं बोडके सांगतात.
advertisement
शेतकऱ्यांनी घरीच बनवावा चारा
आपल्याकडे सहा गाईंसाठी 148 चौरस फुटात हा चारा तयार केला जातो. दिवस भरात सहा वेळा पाणी देऊन 200 लिटर पाण्यामध्ये हा चारा तयार होतो. यामधून शेतकऱ्यांना फायदा होतो. तसेच त्यांचे पैसे वाचतात. गाई जास्त दूध देतात. फॅट चांगली बसते. गाईच्या शेणाचा व गोमूत्रचा देखील वास येत नाही. तसेच या चाऱ्यामुळे गाईचे आरोग्यही चांगले राहते, असे शेतकरी बोडके यांनी सांगितले.
advertisement
खर्चिक पण फायद्याचा चारा
हायड्रोपोनिक चारा निर्मिती करणं थोडं खर्चिक जरी असलं तरी त्याचे फायदे देखील तेवढे आहेत. एकदा केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील काही वर्ष फायदा मिळून देणारी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञा्नाचा वापर करून चारा निर्मिती केली पाहिजे, असेही बोडके सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 07, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
आता मातीशिवाय पिकवा चारा, शेतकऱ्यांच्या फायद्याचं हायड्रोपोनिक तंत्रज्ञान नेमकं काय? Video








