पेट्रोल डिझेल झालं स्वस्त; शिंदे सरकारची मोठी घोषणा, पाहा कितीने

Last Updated:

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आलं. या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी देखील भरपूर घोषणा करण्यात आला आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पेट्रोल डिझेलचा आहे याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरचा VAT हा राज्यभरात समान करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरुन 25 टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेल एक दीड रुपयाने स्वस्त होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बजेटमध्ये केलेल्या घोषणेनुसार पेट्रोल डिझेलचे दर 65 पैशांनी स्वस्त होणार आहेत.
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सुट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होईल.
advertisement
नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रक्कमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २% वरुन १% करण्यात येणार. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आली आहे
view comments
मराठी बातम्या/मनी/
पेट्रोल डिझेल झालं स्वस्त; शिंदे सरकारची मोठी घोषणा, पाहा कितीने
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement