Gold Price वर मोठी अपडेट, 17 सप्टेंबरला सोनं कोसळणार? त्या एका निर्णयावर सर्वांचे डोळे, धाकधूक वाढली

Last Updated:

Gold Price: फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी सोन्याच्या दरात स्थिरता, पण भू-राजकीय तणावामुळे दीर्घकालीन सकारात्मक कल कायम. प्रणव मेर, प्रथमेश माल्या यांचा विश्लेषण.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी सोन्याच्या वेगाला काहीसा ब्रेक लागू शकतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, गेल्या चार आठवड्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या तेजीनंतर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. असे असले तरी भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता सोन्याची दीर्घकालीन चमक कायम राहण्याची अपेक्षा आहे.
advertisement
दरात सातत्यपूर्ण वाढ
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी अँड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते- सोन्याच्या दरात सातत्याने सकारात्मक कल दिसून येत आहे आणि सलग चौथ्या आठवड्यातही सोन्याने वाढीसह व्यवहार बंद केले आहेत. मात्र आठवड्याच्या मध्यात वाढीचा वेग मंदावला. गेल्या एका महिन्यात सोन्याचे दर 10% पेक्षा जास्त वाढले आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदार सध्याच्या दरावर नवीन व्यवहार टाळत आहेत.
advertisement
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे लक्ष
16-17 सप्टेंबर रोजी होणारी फेडरल रिझर्व्हची बैठक सध्या बाजारातील सर्वात मोठी बातमी आहे. गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की, या बैठकीत व्याजदरांवर जो निर्णय घेतला जाईल, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होईल. यासोबतच ब्रिटन, युरोझोन आणि जपानच्या चलनविषयक धोरणांचे निर्णयही गुंतवणूकदारांची पुढील रणनीती ठरवतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की- सध्या सोन्याच्या दरात थोडीशी घसरण किंवा स्थिरता येऊ शकते. परंतु दीर्घकाळात सोन्याचा कल सकारात्मकच राहील.
advertisement
भू-राजकीय तणावामुळे आधार
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील चालू असलेल्या तणावामुळे सोन्याला एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अधिक बळकटी मिळाली आहे. एंजल वनचे तज्ज्ञ प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, अमेरिकेने भारताच्या आयातीवर 50% शुल्क लावल्यामुळे आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरातील अलीकडील वाढीला आणखी वेग मिळाला आहे. म्हणूनच गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, जेणेकरून भविष्यातील दिशा निश्चित करता येईल.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Gold Price वर मोठी अपडेट, 17 सप्टेंबरला सोनं कोसळणार? त्या एका निर्णयावर सर्वांचे डोळे, धाकधूक वाढली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement