Indian Economy : जपानला मागे सारलं, भारतानं करुन दाखवलं, जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

Last Updated:

Indian Economy : भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर ही घोषणा केली.

News18
News18
नवी दिल्ली: भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताची अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सुब्रह्मण्यम म्हणाले, "भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हा माझा डेटा नाही तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचा (IMF) डेटा आहे. भारताने आता जपानला मागे टाकले आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. जर भारताची आर्थिक प्रगती याच गतीने सुरू राहिली तर पुढील 2 ते 3 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
आयएमएफच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन (एप्रिल 2025) अहवालानुसार, 2026 मध्ये भारताचा जीडीपी सुमारे 4187 अब्ज डॉलर्स असेल. तर जपानचा जीडीपी 4186 अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. 2024 पर्यंत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आयएमएफने 2025 आणि 2o26 मध्ये भारताचा विकासदर अनुक्रमे 6.2 टक्के आणि 6.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जो जागतिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे.
advertisement

यशामागचे घटक

भारताच्या या यशामागे कमी उत्पादन खर्च, अनुकूल व्यावसायिक वातावरण, घरगुती आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी आणि जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी हे प्रमुख घटक आहेत. संयुक्त राष्ट्रांनाही भारताच्या या आर्थिक प्रगतीबाबत आशावाद असून त्यांनी भारताच्या धोरणात्मक निर्णयांचे कौतुक केले आहे.

‘विकसित भारत 2047 दिशा

बैठकीदरम्यान "विकसित राज्य ते विकसित भारत 2047" या विषयावर केंद्र आणि राज्यांमध्ये सखोल चर्चा झाली. या बैठकीत उत्पादन, सेवा क्षेत्र, ग्रामीण व शहरी रोजगार, अनौपचारिक क्षेत्र, हरित व सर्क्युलर इकॉनॉमी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंथन झाले. सुब्रह्मण्यम म्हणाले, "भारत आता अशा टप्प्यावर आहे जिथून त्याची अर्थव्यवस्था झपाट्याने उंचावण्याची क्षमता ठेवते. आपण टेक-ऑफ स्टेजवर आहोत."
मराठी बातम्या/मनी/
Indian Economy : जपानला मागे सारलं, भारतानं करुन दाखवलं, जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement